मराठी मनोरंजनविश्वात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन चित्रपटांची घोषणा करण्यात येत आहे. मराठीसह बॉलीवूड गाजवणारा प्रेक्षकांचा लाडका ‘आपला सिद्धू’ म्हणजे सिद्धार्थ जाधव आता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट येत्या १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना पहिल्यांदाच सिद्धार्थ-भूषणची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर अण्णासाहेब तिरमखे यांनी केलं आहे.

Bollywood film stars in grip of mafia extortion
चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
industries minister uday samant proposed bhaskar jadhav to join shinde shiv sena
भास्कर जाधव यांना शिंदे गटाचा थेट प्रस्ताव; रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
sequel of Siddharth Jadhavs film Huppa Huyya
आणि. . . नव्या वर्षाची भेट मिळाली : सिद्धार्थ जाधव, १५ वर्षांनंतर ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला
Kangana Ranaut and Priyanka Gandhi vadra
‘तुम्ही माझा Emergency चित्रपट नक्की पाहा’, कंगना रणौत यांच्या आग्रहानंतर प्रियांका गांधींनी दिलं ‘असं’ उत्तर

हेही वाचा : “क्षितिजाला आय लव्ह यू…”, प्रथमेश परबला ‘अशी’ भेटली खऱ्या आयुष्यातील प्राजू, लव्हस्टोरी सांगत म्हणाला…

सिद्धार्थ-भूषणसह या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर यामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री मयुरी देशमुख सिद्धार्थ व भूषणबरोबर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. मयुरीने या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत यावर “काय आहे नवरीच्या मनी? कोण होणार वरमालेचा धनी? लग्न कल्लोळ…आहेराची तारीख १ मार्च २०२४” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : ट्विंकल खन्नाने ५० व्या वर्षी पूर्ण केलं शिक्षण; अक्षय कुमार पत्नीचं कौतुक करत म्हणाला, “मी शिकलो असतो तर…”

मयुरी देशमुखशिवाय ‘लग्न कल्लोळ’मध्ये अभिनेत्री अमिता देशमुख देखील झळकणार आहे. हा चित्रपट येत्या १ मार्चला प्रदर्शित होईल. सध्या मराठी कलाकार सिद्धार्थला नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.

Story img Loader