रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ‘सर्कस’मध्ये मराठीमधीलही काही कलाकार मंडळी काम करताना दिसणार आहेत. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवही आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – Pathan Controversy : दीपिका पदुकोणची ‘बेशरम रंग’मधील भगवी बिकिनी वादाच्या केंद्रस्थानी; पण या बिकिनीचा डिझायनर कोण?

सिद्धार्थ सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. आताही तो ‘सर्कस’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण उटीमध्ये सुरू आहे. सिद्धार्थ त्याच्या सहकलाकाराबरोबर उटीच्या रस्त्यांवर स्कुटीवरून फिरत असल्याचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ त्याच्या सहकलाकाराला शिवी देताना दिसत आहे. “आम्ही आता उटीला शूट करत आहोत. ***उजव्या बाजूला गाडी घे. उटीचे रस्ते बघा. तू धडपडशील पुढे बघ. उटीची चहाची बाग बघा.” असं सिद्धार्थ व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा – Video : “तुझ्यात दम आहे तर…” राखी सावंत व अपूर्वा नेमळेकरमध्ये मारामारी, घरातील भांडी फोडतानाचाही व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थने मस्तीमध्ये त्याच्या सहकलाकाराला शिवी दिली आहे. पण या व्हिडीओबाबत नेटकरीही कमेंट करत आहेत. अनेकांनी सिद्धार्थच्या केसांवरून त्याला ट्रोल केलं आहे. डोक्यात काय घातलं आहेस, केसांमध्ये चिमणी अडकेल, अरे ही कोणती हेअरस्टाइल, चिमण्यांनी घरटं बांधलंय का? अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.