सिद्धार्थ जाधव मराठी सिनेसृष्टीमधला आघाडीचा अभिनेता आहे. मराठी नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्येही नाव कमावले. विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी या दाक्षिणात्य सुपरस्टार्ससह तो ‘गांधी टॉक्स’ या सायलेंट चित्रपटामध्ये झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमामध्ये व्यग्र आहे. पुढच्या महिन्यामध्ये त्याचा ‘बालभारती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो खूप चर्चेत आहे.
सिद्धार्थ सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय आहे. तो सतत काही-ना-काही पोस्ट करत असतो. दोन-तीन दिवसांपूर्वी सिद्धार्थने लेकीबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये सिद्धार्थच्या लेकीने, इराने पिवळ्या रंगाचा टॉप आणि काळी पॅन्ट घातली आहे. तिने डोक्यावर निळी ओढणी बांधली असल्याचे पाहायला मिळते. “चिते की चाल और इरा की नजर पर कभी संदेह नही करते… आल्या जाधव वहिणी..” असे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे. या फोटोमध्ये त्याने करण सोनावणे आणि सिद्धांत सरफरे या कॉन्टेंट क्रिएटर्संना टॅग केले आहे.
आणखी वाचा – ‘भोला’च्या सेटवर तब्बूच्या डोक्याला झाली जखम; अजय देवगणने शेअर केला व्हिडीओ
करण सोनावणे ऊर्फ फोक्स्ड इंडियन (Focused Indian) आणि सिद्धांत सरफरे या इन्स्टाग्रामवरच्या कॉन्टेंट क्रिएटर्संनी ‘वहिणी’ या ट्रेंडची सुरु केली होती. त्यांनी मराठी सिनेसृष्टीमधील कलाकारांपासून बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह काम केले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सिद्धार्थचा ‘दे धक्का २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना करण आणि सिद्धांत यांची ओळख सिद्धार्थशी झाली होती. इराचा हा फोटो करणने इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे.
आणखी वाचा – अथिया शेट्टीच्या वाढदिवशी केएल राहुलने केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या असण्यानं…”
सिद्धार्थ स्टार प्रवाह वाहिनीवरच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत आहे. रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये तो झळकणार आहे. त्याच्या ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिंबा’, ‘सूर्यवंशी’ यांसारख्या काही चित्रपटामध्ये सिद्धार्थने काम केले आहे.