मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमी आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांना हसवत असतो. सिद्धार्थनं आपल्या अभिनयाची छाप बॉलीवूडमध्येही उमटवली आहे. आता काही काळाच्या विश्रांतीनंतर सिद्धार्थ ‘अफलातून’ या चित्रपटातून महाराष्ट्राला खळखळून हसवायला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून नेटकऱ्यांचा याला चांगलाच प्रतिसाद मिळतं आहे.

‘अफलातून’ या चित्रपटात तीन डिटेक्टिव्ह मित्रांची धमाल दाखवण्यात आली आहे. श्री, आदी, मानव असं या तिघा मित्राचं नाव आहे. यातील एक बघू शकत नाही, दुसरा ऐकू शकत नाही, तर तिसरा बोलू शकत नाही. असे हे तिघं मित्र कोट्यवधीची फसवूक झालेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीची केस हातात घेतात. त्यानंतर ही केस उलगडताना येणाऱ्या अडचणींवर ते कशाप्रकारे मात करतात? हे चित्रपटात रंजक पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे.

Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
chris martin visits mahakumbh with dakota johnson
अंगावर भगवे वस्त्र; चेहऱ्यावर आनंद, Coldplay चा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन प्रेयसीसह पोहोचला महाकुंभात; व्हिडीओ झाला व्हायरल
Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
chris martin sing vande matram 2
Coldplay: ख्रिस मार्टिननं अहमदाबादमध्ये गायलं ‘वंदे मातरम्’ आणि ‘माँ तुझे सलाम’; चाहत्यांच्या प्रतिक्रियांनी वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
bombay HC slaps Rs 1 lakh cost on ED for case on realtor
विकासकावर खोटा खटला; पुराव्यंशिवाय कारवाई, न्यायालयाचे ताशेरे
NCPs MLA from Wai Makarand Jadhav appointed as Guardian Minister of Buldhana
बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी

हेही वाचा – “हिंदू धर्माचा अपमान…,” OMG 2 मधील अक्षय कुमारचा लूक पाहून नेटकऱ्यांचा संताप

हेही वाचा – Video: “ते कधीच…,” नितीन गडकरींनी सांगितली शरद पवारांबद्दल खुपणारी गोष्ट

‘धमाल’, ‘टोटल धमाल’ या हिंदी चित्रपटाचे लेखक परितोष पेंटर यांनी ‘अफलातून’च्या लेखनाची व दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. तसेच त्यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिकाही साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात कॉमेंडी किंग जॉनी लिवर व त्यांचा मुलगा जेसी लिवर एकत्र दिसणार आहे. जॉनी लिवर यांनी ‘नवाब साहब’ ही भूमिका साकारली आहे. तर जेसी लिवर ‘आफताब’च्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा – सकीना-तारा सिंहच्या लव्ह स्टोरीमध्ये नाना पाटेकरांची दमदार एंट्री, दिसणार ‘या’ भूमिकेत

साहा अँड सन्स स्टुडिओस् आणि आयडियास द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत ‘अफलातून’ चित्रपट २१ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ जाधव, जॉनी लिवर, जेसी लिवर यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात श्वेता गुलाटी, जयेश ठक्कर, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, रेशम टिपणीस दिसणार आहेत.

Story img Loader