विनोदाचं अचूक टायमिंग, स्वभावातील साधेपणाने आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता सिद्धार्थ जाधवने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘दे धक्का’, ‘जत्रा’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘इरादा पक्का’ अशा अनेक चित्रपटांमुळे सिद्धार्थ घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने मराठीसह बॉलीवूड चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सिद्धार्थ ‘आता होऊ दे धिंगाणा २’ या शोमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली.

हेही वाचा : घटस्फोटानंतर झालेल्या ‘गॉसिप’बद्दल सलील कुलकर्णींनी प्रथमच केलं भाष्य; म्हणाले, “ही वृत्ती…”

vhp on ayan mishrea murder case
Aryan Mishra Murder : गोरक्षकांकडून आर्यन मिश्राची हत्या, हिंदुत्ववादी संघटनांनी हात झटकले; म्हणाले, “हिसांचाराचे समर्थन नाही”
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…
loksatta editorial on president draupadi murmu
अग्रलेख: अब द्रौपदी प्रश्न न पूछेगी…
loksatta kutuhal efficient and intelligent humanoid robots of future
कुतूहल : भविष्यातील कार्यक्षम आणि बुद्धिमान ह्यूमनॉइड
doctors protest in Kolkata against Rape and Murder Case
अग्रलेख : मुली, तू जन्मूच नकोस…

अभिनेता सिद्धार्थ जाधवने यावेळी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. इंडस्ट्रीत काम करताना त्याने स्वत:ला सगळ्या व्यसनांपासून दूर ठेवलं आहे. याविषयी अभिनेता म्हणाला, “या इंडस्ट्रीत सुनील बर्वे, दिलीप काका असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत जे कधीही दारू पित नाहीत किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नाहीये.”

हेही वाचा : “आपण ८ वर्षांपूर्वी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंडची पोस्ट, म्हणाली…

“माझ्या आईला मी फार आधी एक वचन दिलंय ते म्हणजे दारू-सिगारेटला मी कधीच हात लावणार नाही आणि आत्महत्या करणार नाही. हे वचन मी माझ्या आईला दिलेलं असल्याने मी कधीच या गोष्टी करणार नाही. या गोष्टींपासून मी दूर आहेच पण, एक भावनिक कनेक्ट म्हणून मी माझ्या आईला हे वचन दिलं आहे.” असं सिद्धार्थ जाधवने सांगितलं.

हेही वाचा : रणवीर-दीपिकाच्या नात्याबद्दल काय होती पदुकोण कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया? अभिनेत्री म्हणाली, “माझ्या अम्माने खोलीत…”

दरम्यान, सिद्धार्थ जाधव सध्या ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता २१ ऑक्टोबरपासून दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना या कार्यक्रमाचे नवीन भाग स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत.