मनोरंजनसृष्टील अनेक कलाकार प्रेमाची कबूली देत लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवासांपूर्वीच दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने प्रेमाची कबूली देत गायक आशिष कुलकर्णीबरोबर साखरपुडा केला. त्यानंतर बिगबॉस फेम अभिनेता प्रसाद आणि अमृता देशमुखने गुपचूप साखरपुडा उरकला.
आता यांच्यापाठोपाठ प्रसिद्ध गायिका आनंदी जोशीनेही गूपचूप लग्न केलं आहे. आनंदीने प्रसिद्ध गायक जसराज जोशीबरोबर लग्नगाठ बांधली आहे. आनंदीने या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आनंदीने ही आनंदाची बातमी दिली आहे. आनंदीने पोस्टमध्ये लिहिलं आहे. “अत्यंत आदराने, जीवनाच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवताना आम्हाला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे.”
आनंदीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ‘हासरा, नाचरा, जरासा लाजिरा, सुंदर गोजिरा.. श्रावण आला..’ हे तिचं गाण गाण चांगलच गाजलं. तसेच ‘नारबाची वाडी’चित्रपटातील‘शबय.. शबय.’ गाण्यालाही आनंदीने आपला आवाज दिला आहे. रेगमप’च्या पहिल्याच पर्वात आनंदी स्पर्धक म्हणून आली होती. ‘दुनियादारी’मधलं ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’, ‘अजिंठा’मधलं ‘चैताचा रंगसंग’, ‘इश्कवाला लव्ह’मधलं ‘तू दिसता’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’मधलं ‘बावरी’ ही तिची गाणी लोकप्रिय आहेत.सिनेमांव्यतिरिक्त नाटक आणि मालिकांसाठीही ती गायली आहे. ‘सख्खे शेजारी’ या नाटकात आणि ‘जावई विकत घेणे आहे’, ‘तुझं माझं जमेना’, ‘लगोरी’, ‘लज्जतदार’ अशा मालिकांच्या शीर्षकगीताला आनंदीने आपला आवाज दिला आहे.
जसराज जोशीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर जसराजने मराठी, हिंदीबरोबर अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. जसराजने हिंदी सा रे ग म प २०१२ ची स्पर्धा जिंकली आहे. ‘माझं नाव शिवाजी’. ‘डबल सीट’, ‘ऑनलाईन-बिनलाईन’ सारख्या मराठी चित्रपटांमधील त्याने गायलेली गाणी चांगलीच गाजली. तसेच ‘बाप रे बाप’ या गुजराती चित्रपटातील गाण्यालाही जसराजने आपला आवाज दिला आहे.