अवधूत गुप्ते मराठी मनोरंजनसृष्टीतल लोकप्रिय गायक आहे. आपल्या आवाजाने अवधूतने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. आजपर्यंत अवधूतने अनेक सुपरहिट गाण्यांची निर्मिती केली आहे. गायनाबरोबरच अवधूतने संगीत दिग्दर्शक, सूत्रसंचालक, परिक्षक दिग्दर्शक व निर्मात्याचीही भूमिका पार पाडली आहे. आपल्या गाण्यांबरोबरच अवधूत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- आता खेळ सुरु! ‘झिम्मा २’ च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात; जाणून घ्या कुठे मिळतील तिकीटं

सोशल मीडियावर अवधूत मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतचं अवधूतने शनिशिंगणापूरला जाऊन शनिदेवांचे दर्शन घेतले. या दर्शनचा व्हिडीओ अवधूतने आपल्या इन्स्टाग्रमावरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अवधूतने दिलेल्या कॅप्शनचीही सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. व्हिडीओ शेअर करत अवधूतने शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवांच्या मंदिराला घुमट किंवा कळस का नाही याचं कारण सांगितलं आहे.

हेही वाचा- Video : ‘झिम्मा २’च्या ‘मराठी पोरी’ गाण्याची कमाल; कॅनडात -२°C तापमानात साडी नेसून तरुणीचा भन्नाट डान्स

अवधूतने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं “मध्यंतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीरामपूरला जाणं झालं. तिथून थेट शनिशिंगणापूर गाठलं. माननीय आमदार शंकररावजी गडाख यांच्या सौजन्याने शनि देवाचं आयुष्यात पहिल्यांदाच दर्शन घेतलं. शनिदेव हा सूर्यपुत्र अर्थात सूर्याचा पुत्र आहे. त्यामुळे त्याला नेहमीच सूर्यकिरणांखाली राहायला आवडतं. यामुळेच या मंदिराला घुमट किंवा कळस नाही आणि याचे बांधकामदेखील केलेलं नाही. त्यामुळेच शनिदेवाला हार-फुलं न वाहता तेल वाहिले जाते.”

अवधूतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. अवधूतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, १६ भागांमध्येच हे पर्व संपवण्यात आले होते. सध्या अवधूत कलर्स वाहिनीवरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.