काही महिन्यांपूर्वी ‘मी वसंतराव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला. या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होत होते. गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांचे नातू लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी याने केलं. आता या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी वसंतराव’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याबरोबरच राहुल देशपांडे यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या याच कामासाठी त्यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्त त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा : “भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे आणि…” गायक राहुल देशपांडेचं ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर

राहुल देशपांडे यांची पत्नी नेहा देशपांडे यांनी या ट्रॉफीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहीलं, “आपण सर्वच फिल्मफेअर पुरस्कार पाहत मोठे झालो आहोत आणि म्हणूनच हा पुरस्कार खूप खास आहे. पहिल्यांदा घडलेली गोष्ट नेहमीच स्पेशल असते. ही पहिली ब्लॅक लेडी, संगीत दिग्दर्शक म्हणून ‘मी वसंतराव’ या तुझ्या पहिल्या चित्रपटातील ‘कैवल्य गान’ या तुझ्या गाण्यासाठी. मला तुझा खूप अभिमान वाटतो. धन्यवाद फिल्मफेअर राहुलला हा पुरस्कार दिल्याबद्दल.”

आणखी वाचा : ‘मी वसंतराव’चा प्रवास खूप काही शिकविणारा – राहुल देशपांडे यांची भावना

आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर राहुल देशपांडे यांचे चाहते, मनोरंजन क्षेत्रातील त्यांचे मित्रमंडळी कमेंट्स करत त्यांचं अभिनंदन करत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer rahul deshpande gets filmfare award for debutant music director his wife shared special post rnv