‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. या चित्रपटाने एका आठवड्यात चांगली कमाई केली. त्यानिमित्त मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायिकेने या चित्रपटाच्या टीमला एक खास सरप्राईज दिलं आहे.

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केली. त्यानिमित्त या चित्रपटाची पार्श्वगायिका सावनी रविंद्र हिने या चित्रपटाच्या टीमला एक सरप्राईज दिलं.

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार

आणखी वाचा : Baipan Bhari Deva Collection: ‘बाईपण भारी देवा!’ची दमदार कामगिरी, तीन दिवसांत जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

सावनीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केल्याच्या निमित्ताने जिओ स्टुडिओच्या ऑफिसमध्ये जाताना सावनी छानसा बुके आणि एक केक घेऊन गेली, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर तिथे गेल्यावर तिचं हे सरप्राईज सर्वांनाच आवडलं. या चित्रपटाची संपूर्ण टीम तिथे उपस्थित होती. सावनीने आणलेला केक कापून त्यांनी सेलिब्रेशन केलं.

हेही वाचा : ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील अत्यंत गाजत असलेलं गाणं, अनुभव शेअर करत म्हणाली…

सावनीच्या या अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं असून तिचा हा उत्साह आणि टीमबद्दल वाटणारं प्रेम याचं सर्वजण कौतुक करत आहेत. तर याचबरोबर या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी हा चित्रपट खूप आवडल्याचं सांगत आहेत.

Story img Loader