भारतीय संगीत विश्वातील एक नावं ही कायम स्मरणतात राहिल त्या म्हणजे दिवंगत गायिका लता मंगेशकर. तब्बल ६ दशक लता मंगेशकर यांनी एक हाती या क्षेत्रावर राज्य केलं. आज त्या या जगात नसल्या तरी त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहे. आज लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त कलाविश्वातील अनेक मंडळींना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
हेही वाचा- “तू मला सर्वात…”, दिवंगत बहिणीच्या आठवणीत मराठी अभिनेत्री भावुक, काही महिन्यांपूर्वी झालं निधन
लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त गायिका सावनी रविंद्रने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सावनीने लता मंगेशकरांचा तरुणपणीचा एक जूना ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत सावनीने लिहलं “भारतरत्न लतादीदींच्या पवित्र स्मृतींना शतशः नमन”
लता मंगेशकर यांच ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले.
हेही वाचा- “ते आणि त्यांचे कुटुंबीय…”, अमृता खानविलकरने घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाप्पाचं दर्शन, ‘वर्षा’मध्ये मिळालेल्या वागणुकीबद्दल म्हणाली…
लता मंगेशकरांनी आपल्या करिअर काळात २५ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. ३६ भारतीय भाषांमध्ये आणि काही विदेशी भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत खूप लहान वयात त्यांनी गाणं गायला सुरुवात केली होती. ‘आएगा आनेवाला’ या गाण्याने लता मंगेशकरांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर लता मंगेशकर यांनी शंकर जयकिशन, नौशाद अली, ओपी नय्यर, एस डी बरमन, आर डी बरमन, अमरनाथ, हुसनलाल-भगतराम यांच्यासारख्या नावाजलेल्या संगीतकरांबरोबर काम केलं होतं.
हेही वाचा- “तुम्ही आहातच इथे…” लतादीदींसाठी सलील कुलकर्णी यांची खास पोस्ट; जुना फोटो शेअर करत म्हणाले…
२००१ साली लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २००७ साली फ्रान्स सरकराने त्यांना Officer of the Legion of Honour पुरस्काराने सन्मानित केलं होतं. तसेच त्यांना दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं.