सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व गायक शंकर महादेवन यांनी आजवर चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट गाणी दिली. त्यांच्या आवाजाचे तर लाखो चाहते आहेत. शंकर महादेवन यांच्याबरोबरच त्यांची दोन्ही मुलंही कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. हे फार कमी जणांना ठाऊक असेल. पण याचबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. शंकर महादेवन यांच्या दोन्ही मुलांना मराठी चित्रपटाची भूरळ पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ महादेवन व शिवम महादेवन ही शंकर महादेवन यांची दोन्ही मुलं संगीत क्षेत्रामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करू इच्छित आहेत. दोघंही आपल्या वडिलांकडून प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. आता सिद्धार्थ-शिवम मराठी चित्रपटासाठी काम करताना दिसणार आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटासाठी या दोघांनी काम केलं आहे.

‘सनी’ चित्रपटाबाबत ललित प्रभाकरने प्रत्येक माहिती शेअर केली आहे. या चित्रपटामध्ये एकूण सहा गाणी आहेत. सिद्धार्थ महादेवने सौमिल शृंगारपुरेसह ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर सिद्धार्थसह शिवम महादेवननेही चित्रपटामधील गाणी गायली आहेत. निखिल डिसुझा, आनंदी जोशी यांच्या आवाजामधील गाणीही प्रेक्षकांना ऐकायला मिळतील.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम दिशा वकानीला घशाचा कर्करोग? कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सांगितलं सत्य, म्हणाले, “आवाज काढल्यामुळे…”

ललितची मुख्य भूमिका असलेल्या ‘सनी’चा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. परदेशात शिक्षणासाठी गेलेला मुलगा आणि त्यानंतर त्याला येणारी घराची आठवण या कथेवर चित्रपटाची कथा आधारित आहे. येत्या १८ नोव्हेंबरला ‘सनी’ चित्रपटगृहामध्ये दाखल होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer shankar mahadevan son shivam and siddharth work for lalit prabhakar sunny marathi movie see details kmd