मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं नुकतंच निधन झालं. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी होती. पण गेल्याच वर्षी रमेश देव यांचं निधन झालं आणि अल्झायमर्स या आजारामुळे २४ ऑगस्टला सीमा देव यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं अजिंक्य देव, अभिनय देव, दोन सुना, नातवंडं आहेत. सीमा देव यांच्या निधनानंतर त्यांची धाकटी सून स्मिता देव यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे; जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

स्मिता देव यांनी पोस्टमध्ये लिहील आहे की, “आई-बाबा गमावणं हे स्वीकारणं खूप अवघड असतं. माझ्या सासूबाई या माझ्या आईपेक्षा काही कमी नव्हत्या. त्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रीणीसारख्या होत्या. जेव्हा मी-अभि डेट करायचो. तेव्हा त्यांना वाटलं होतं की, मी बांद्राची मुलगी आहे. खूप आधुनिक विचारांनी आहे. आपल्या कुटुंबात कसं जुळवून घेईल? पण कालांतराने माझं व अभिचं लग्न झाल्यानंतर, त्यांना माझ्याबद्दल कळल्यानंतर त्यांना सुखःद धक्का बसला. कारण मी त्यांना ते सिद्ध करून दाखवलं. तेव्हापासून ते आतापर्यंत आमच्यात घनिष्ठ मैत्रिणीचं नातं होतं.”

Kolkata Doctor Rape and Murder
Kolkata Rape and Murder : कोलकाता रुग्णालयातले आंदोलक डॉक्टर आणि ममता बॅनर्जी यांच्यात दोन तास बैठक, नेमकं काय घडलं?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Exploding notes in Anand Ashram Dighe confidant Nandkumar Gorule was enraged
आनंद आश्रमात नोटांची उधळण, दिघे साहेबांचे विश्वासू नंदू गोरूले संतापले, म्हणाले…
Mahant Ramgiri Maharaj and CM Eknath Shinde
Mahant Ramgiri Maharaj: महंत रामगिरी महाराज कोण आहेत? कोणत्या विधानामुळे त्यांच्यावर ५१ एफआयआर दाखल झाले?
Yuvraj Singh on Father Yograj Singh Says My Father Has Mental Issues Old Video Goes Viral
Yuvraj Singh: “माझ्या वडिलांचं मानसिक आरोग्य…”, योगराज सिंगांच्या धोनी-कपिल देव यांच्यावरील वक्तव्यानंतर युवराजचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
A case has been registered against BJP MLA Parinay Phuke and his family Nagpur news
भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल, दिवंगत भावाच्या पत्नीची पोलिसात तक्रार
when raj kapoor met nargis dutt at rishi kapoor wedding
“माझे पती देखणे अन् रोमँटिक आहेत, त्यामुळे…”; नर्गिस यांना स्पष्टच बोलल्या होत्या राज कपूर यांच्या पत्नी

हेही वाचा – “आई गेली,” सीमा देव यांच्या निधनावर त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया; अजिंक्य म्हणाले, “तिला काही आठवत नव्हतं पण…”

“त्या नेहमी म्हणायच्या, मला एक मुलगी होती. पण ती कुठेतरी हरवली होती, जी तू आहेस. त्या माझ्यावर खूप करायच्या. जेव्हा आम्ही दोघी अभिनयची कामावरून घरी येण्याची वाट पाहत बसलेल्या असायचो. तेव्हा त्या सासू-सूनेच्या मालिका पाहायच्या आणि मी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पडू राहायची. मग त्या डोक्यावरून हात फिरवायच्या. यामुळे माझा दिवसभराचा सगळा थकवा निघून जायचा.”

“आम्हा दोघींना वेगळं करणार असं कोणीच नव्हतं. साडी खरेदीसाठी किंवा भाजीपाला, किराणा माल आणण्यासाठी आम्ही एकत्र जायचो. आजही मी भाजीपाला घेण्यासाठी दादरला जाते, तेव्हा भाजीवाले धावतपळत माझ्या गाडीजवळ येऊन त्यांची विचारपूस केल्याशिवाय राहत नाहीत. केळ्याचा घड देतात आणि अजिबातच त्याचे पैसे घेत नाहीत. मला माहितेय की, हे लोकं फक्त त्यांच्यासाठी करत असतात.”

हेही वाचा – “तेराव्या वर्षांपासून ती संघर्ष करत होती…”, सीमा देव यांच्या निधनावर मुलगा अभिनय यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “गेल्या तीन-चार वर्षांपासून…”

पुढे त्यांनी लिहील की, “त्यानंतर दुपारी आम्ही आमच्या आवडीचे पदार्थ खायचो. मग झोपण्यापूर्वी त्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी मला सांगायच्या. बालपणीच्या गोष्टी, त्यांनी केलेला संघर्ष, त्या बाबांना (रमेश देव) कशा भेटल्या?, त्यांचं त्यांच्या सासूशी असलेलं सुंदर नातं, असं सर्व काही त्या मला सांगत असतं. आमचे सर्वात धाकटे प्रताप काका त्यांना वहिनी नाही तर आईच म्हणायचे. त्यांनी फक्त आपल्या मुलांवर प्रेम केलं आणि त्यांचं संरक्षण केलं असं नाही. तर त्या भाची आणि पुतण्यांवरही तितकचं प्रेम करायच्या. आमच्या संपूर्ण कुटुंबांची मुठ त्यांनी चांगल्याप्रकारे घट्ट बांधली होती.”

“जेव्हा अभिनय आणि मी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता आणि माझ्यासाठी एक कठीण आव्हान होतं. पण आम्ही याला सामोरे जाऊ शकलो नाही. आम्ही दोघांना आमच्याबरोबर राहण्यास सांगितलं. पण त्यावेळी त्या दोघांना त्यांचा कम्फर्ट झोन खूप महत्त्वाचा होता, असं मला वाटतं होतं. मात्र शेवटी त्यांच्यावर अशी एक वेळ आली जेव्हा त्या स्वतःला ओळखण्यासाठी धडपडत करून लागल्या.”

“त्यांच्यासाठी अभिनय हा त्यांचा दादा होता आणि मी ओळखीची व्यक्ती असल्यामुळे मला चिकटून राहायच्या. स्मृतिभ्रंश हा एक असा आजार आहे, जिथे तुम्हाला डोळे झाकून अनोळखी व्यक्तींच्या खोलीत सोडल्यासारखं वाटतं.”

हेही वाचा – सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांनी शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “शेवटी सर्वांना…”

दरम्यान, कालच अभिनेते अजिंक्य देव यांनी देखील आईच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ‘ती होती आणि आता ती नाही,’ असं लिहीत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता.