२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून अभिनेत्री स्मिता शेवाळे प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटातील अंकुश आणि स्मिताचं “आभास हा…” हे गाणं आजही घराघरांत लोकप्रिय आहे. यानंतर तिने अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. अभिनेत्री नुकतीच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटामध्ये झळकली होती. यामध्ये स्मिताने नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्या पत्नी सावित्रींबाईंची भूमिका साकारली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : लग्नाआधी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखने घेतलं नवीन घर? दारावरच्या नेमप्लेटने वेधलं लक्ष

‘सुभेदार’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्रीने नवं घरं खरेदी करत तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. आता स्मिताने नवीन आलिशान गाडी घेत तिचा लाडका लेक कबीरला गोड सरप्राईज दिलं आहे. नवीन गाडी खरेदी केल्याचा व्हिडीओ स्मिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : Video: “मला बाबा व्हायचं आहे…”, आशुतोषने अरुंधतीकडे व्यक्त केली इच्छा, ‘आई कुठे काय करते’चा नवीन प्रोमो पाहिलात का?

स्मिताने कबीरसह मिळून नव्या गाडीची पूजा केली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री लिहिते, “ही कार घेताना मला खूप चांगली सर्विस देण्यात आली. आम्ही कलाकार शूटिंगमध्ये व्यस्त असतो हे जाणून येथील कर्मचाऱ्यांनी कार प्रोसेसची सगळी कामं अगदी व्यवस्थित पार पाडली. कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ दिला नाही. अतिशय आदरपूर्वक आणि संयमानं माझ्या सगळ्या शंकांचं निरसन केलं त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.”

हेही वाचा : “स्वत:च्या मुलींचे चेहरे दाखवत नाही अन्…”, नेटकऱ्याच्या टीकेला क्रांती रेडकरने दिलं थेट उत्तर; म्हणाली, “जबाबदारी…”

दरम्यान, नव्या गाडीसाठी नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय विकास पाटील, अश्विनी महांगडे, प्रियांका केतकर, गिरिजा प्रभू, नुपूर, किशोरी अंबिये या कलाकार मंडळींनीदेखील स्मिताला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालायचं झालं, तर अलीकडेच स्मिता महत्त्वाची भूमिका साकारत असलेल्या ‘दार उघड बये’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.