Marathi Actress Sneha Chavan : दिवाळीनंतर आता मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींच्या घरात लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता येत्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. शाल्व किंजवडेकर – श्रेया डफळापूरकर, हेमल इंगळे यांच्या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आणखी एका अभिनेत्रीने लग्न झाल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

‘लाल इश्क’ या चित्रपटामुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्नेहा चव्हाण दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

स्नेहा चव्हाणने शनिवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हाताला मेहंदी लावल्याचा फोटो शेअर केला होता. यानंतर नवऱ्यासह वेडिंग केक कापतानाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. स्नेहाचा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याला तिचे कुटुंबीय व जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित राहिले होते.

हेही वाचा : ‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…

अनिकेत विश्वासरावबरोबर घटस्फोट झाल्यावर स्नेहाने नव्याने आपलं आयुष्य जगण्यास सुरुवात केली होती. अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवायची. या संपूर्ण प्रवासात स्नेहाला तिच्या जवळच्या लोकांची मोठी साथ मिळाली. आता पुन्हा एकदा एका नव्या आयुष्याला सुरुवात करत अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे.

 Sneha Chavan
स्नेहा चव्हाण ( Sneha Chavan )

हेही वाचा : आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

Sneha Chavan
स्नेहा चव्हाण ( Sneha Chavan )

लग्नानिमित्त अभिनेत्रीच्या घरात केलेली आकर्षक सजावट व रोषणाई तसेच घराबाहेर काढलेली छानशी रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेते. अभिनेत्रीने वेडिंग केक कापताना सुंदर असा गाऊन घातला होता. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तर, लग्न लागताना स्नेहा व तिच्या पतीचा पारंपरिक लूक पाहायला मिळाला. या दोघांबरोबर स्नेहाच्या भावाने खास फोटोशूट केल्याचं देखील पाहायला मिळत आहे. याचा व्हिडीओ ‘मराठी सेलिब्रिटी कट्टा’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो

दरम्यान, स्नेहा चव्हाणचा ( Sneha Chavan ) लग्नसोहळा पार पडल्यावर तिच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader