लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय या भूमिका उत्तमरित्या निभावणारे लोकप्रिय कलाकार म्हणजे प्रवीण तरडे. या कलाकारानं मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी मराठीसह हिंदीतही काम केलं आणि आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत झळकणार आहेत.

या बहुआयामी कलाकाराचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडियाद्वारे मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी प्रवीण तरडेंना शुभेच्छा देत आहे. पत्नी स्नेहलने प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे. स्नेहलने एक व्हिडीओ शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा – ‘या’ दोन कारणामुळे ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटींच्या क्लबमध्ये जाऊ शकला नाही; दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी व्यक्त केली होती खंत

अभिनेत्री स्नेहलने प्रवीण तरडेंबरोबर गप्पा मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘यारियां २’ चित्रपटातील ‘ऊंची ऊंची दीवारे’ हे गाणं व्हिडीओच्या मागे लावण्यात आलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्नेहलने लिहीलं आहे, “वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियवरा! धकाधकीच्या जीवनात, कामाच्या धबडग्यात प्रेमाचे असे गोड, निवांत क्षण तुला आयुष्यभर लाभोत या शुभ कामना!”

हेही वाचा – प्रवीण तरडे : ‘देऊळबंद’, ‘धर्मवीर’ ते मुळशीच्या मातीशी नाळ जोडलेला ‘दोस्तांचा दिग्दर्शक’

स्नेहल तरडेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रवीण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं लिहीलं की, “किती गोड व हृदयस्पर्शी क्षण… आणि नातं देखील… प्रवीण सरांचं व्यक्तिमत्व म्हणजे अस्सल मराठमोळ्या संस्कार आणि परिपक्व विचारांची ढाल आहे… खरंच दोघांमधील प्रेमाचं पवित्र नातं या निखळ मनमोकळ्या संवादामुळे नेहमीच असंच रहावं… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…” तसेच दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं की, “मराठमोळे उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि पुणेरी सोन्याचे पान असलेले आमचे प्रवीण तरडे सर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

Story img Loader