केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळाले असून नुकतीच ‘बाईपण भारी देवा’ची ग्रॅंड सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी कलाकारांनी अनेक किस्से, शूटिंगदरम्यानच्या गमतीजमती प्रेक्षकांबरोबर शेअर केल्या.
हेही वाचा : “कधी निर्भया, कधी मुंबई, आणि आता मणिपूर…”, प्रसिद्ध गायकाने मणिपूर घटनेवर व्यक्त केला संताप
‘बाईपण भारी देवा’मध्ये पल्लवीची भूमिका साकारणाऱ्या सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर सुद्धा या पार्टीला उपस्थित होता. सोहमला दिग्दर्शक केदार शिंदेंनी त्याच्या आईबद्दल अनेक प्रश्न विचारले. “सुचित्रा सेटवर मेकअप करणे गरजेचे आहे का? मेकअप का करायचा असे अनेकदा विचारायची घरीही ती अशीच करते का?” यावर सोहमने मजेशीर उत्तर दिले.
हेही वाचा : “इज्जत की बची ना चिंधियाँ, वहाँ बिके पवार और सिंधिया…”; मणिपूरच्या घटनेवर स्वानंद किरकिरेंचा सणसणीत टोला
सोहम बांदेकर म्हणाला, “आईच्या आवाजाला फिडबॅक देणारा मी एकटाच असल्याने या चित्रपटात माझे कास्टिंग झाले. कारण तिच्याशी बोलताना अनेकजण खूप घाबरतात. माझ्या घरी माझे मित्र येतात तेव्हा त्यांना वाघ वैगेरे पाहिल्याचा फिल येतो. माझ्या बाबांना ते लोक हाय, हॅलो करतात आणि दबक्या आवाजात काकू आहेत का घरी असे विचारतात.”
सोहम पुढे म्हणाला, “माझ्या मित्रांनी आयुष्यात कधीही न खाल्लेल्या पालेभाज्या आणि उसळी माझ्या घरी काहीही न बोलता खाल्या आहेत. कारण आईने विचारलं भाजी नाही आवडली का? तर मित्र लगेच म्हणतात, ‘नाही काकू सॉलिड झालीये भाजी…’ ते सगळे आईला घाबरतात. त्यामुळे तुमच्या प्रश्नाला मी उत्तर नाही देऊ शकत.”
हेही वाचा : “आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही…”, मणिपूर घटनेवर संतापली अभिज्ञा भावे; म्हणाली…
सोहमचे उत्तर ऐकून केदार शिंदे म्हणतात, “इथे आई उभी आहे… तुला कळतंय का तू किती बोलला आहेस?”, यावर सोहम पुन्हा म्हणतो, “मी तिच्याकडे आता बघणारच नाही इथूनच निघून जाणार आहे.” सोहमचे मजेशीर उत्तर ऐकल्यावर उपस्थित सगळेजण हसू लागतात.