अभिनेता सोहम बांदेकर हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सगळीकडे कौतुकही होत आहे. नुकतंच सोहमने ‘बाईपण भारी देवा’ बघितल्यानंतर काय भावना होती याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- “हैराण केलंय बायकांनी…”; चित्रपटगृहातील शिपायाने सुकन्या मोनेंकडे मांडली होती व्यथा, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. याचबरोबर या चित्रपटामध्ये सुचित्रा बांदेकर व आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने छोटीशी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो सुचित्रा बांदेकर सकारात असलेल्या पल्लवी या व्यक्तिरेखेचा मुलगा दाखवला आहे.

हेही वाचा- “एक लक्षात ठेवा…”; नोकरी सोडून अभिनय करु इच्छिणाऱ्या जयंत सावरकरांना पत्नीने दिलेला मोलाचा सल्ला

नुकतचं सोहमने हा चित्रपट बघितल्यानंतर काय भावना होती याबाबातचा खुलासा केला आहे. सोहम म्हणाला, “मी खूप रडतो. मी कधीच रुमाल सोबत घेत नाही. बाईपण भारी देवा बघताना मी बाबांच्या बाजूला बसलो होतो. आणि आम्ही दोघे खूप रडत होतो. मी आईला भेटल्यावर खूप घट्ट मिठी मारली. कारण मला काही बोलता येत नव्हतं. मी खूप भावनिक झालो होतो. मी हा चित्रपट दोन तीनदा बघितला. हा चित्रपट मला खूप शिकवून गेला.”

हेही वाचा- “बायकोचे दागिने विकले, डोक्यावर ९० लाखांचं कर्ज…; केदार शिंदेंनी दिला कटू आठवणींना उजाळा, म्हणाले…

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ६५.६१ कोटींची कमाई केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. महिलांवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला पुरुष वर्गाकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाततीत या चित्रपटाने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या वेड चित्रपटालाही मागे टाकले आहे.

Story img Loader