दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महेश पटवर्धनचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या अभिमान गीतावर आपली मराठमोळी अप्सरा थिरकली आहे. याचा खास व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. ‘नटरंग’ चित्रपटामुळे आज तिला सर्वत्र अप्सरा म्हणून देखील संबोधलं जातं. सोनालीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनयाबरोबरच ती उत्तम नृत्यांगणा सुद्धा आहे. सोनाली तिची खास मैत्रीण फुलवाबरोबर अनेकदा डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. सध्या सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोनाली कुलकर्णीने महाराष्ट्र दिनामित्त ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या अभिमान गीतावर जबरदस्त डान्स केला आहे. यावेळी तिला मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरने साथ दिली. दोघींनीही खास अंदाजात यावर डान्स केला.
हेही वाचा : महादेव बेटिंग ॲपप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खानला छत्तीसगडमधून अटक
सोनालीने जांभळ्या रंगाची व त्याला गुलाबी रंगाचा पदर असलेली सुंदर अशी नऊवारी साडी नेसली होती, तर फुलवाच्या मरुम रंगाच्या नऊवारी साडीने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कमरपट्टा, नाकात नथ असा लूक त्या दोघींनी केला होता. सोनालीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यामध्ये सोनाली आणि फुलवाच्या अनोख्या व जबरदस्त केमिस्ट्रीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे.