अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या ‘डेट भेट’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात सोनालीसह संतोष जुवेकर आणि हेमंत ढोमे या दोन अभिनेत्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या संपूर्ण टीमने अलीकडेच मॅजिक एफएमच्या ‘कट्ट्यावरच्या गप्पा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी या तिन्ही कलाकारांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि पहिल्या डेटचे किस्से प्रेक्षकांना सांगितले. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने यानिमित्ताने तिच्या क्रशबद्दल खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : भर कार्यक्रमात प्रसिद्ध हॉलीवूड रॅपरवर चाहत्याने फेकले ड्रिंक, संतप्त गायिकेने रागाच्या भरात माइक उचलला अन्…

सोनाली कुलकर्णी म्हणाली, “लग्नाआधी मी एका विचित्र डेटवर गेले आहे. आता सांगायला हरकत नाही की, सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्यावर माझा प्रचंड क्रश होता. मला एक लंडनहून स्थळ आले होते त्या मुलाचे नावही राहुल देशपांडे होते. केवळ दोघांची नावं सारखी असल्याने मी त्या मुलाला भेटले. पण, तो मुलगा प्रचंड कंटाळवाणा होता. पूर्णवेळ तो अरे बापरे! अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या झोनमध्ये होता.”

हेही वाचा : “तुला लहान मुलांमध्ये काय आवडतं?”, अवधूत गुप्तेंच्या प्रश्नावर सई ताम्हणकरने दिलं भन्नाट उत्तर; म्हणाली, “त्यांच्या नाकातून शेंबूड…”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “जो मुलगा माझ्या ऑनस्क्रीन इमेजच्या प्रेमात आहे अशा मुलाबरोबर मला लग्न करायचे नव्हते. त्यामुळे मी त्याला थोड्यावेळाने चला आपण निघूया…असे म्हणाले. त्यावर तो मुलगा मला म्हणाला, मला माहितीये तुला मी आवडलो नाही. पण, मी तुला भेटलो हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याच्या मनात माझ्याशी लग्न वगैरे करण्याचा विचार नव्हता. तो मुलगा हे माझ्या तोंडावर म्हणाला त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी त्याला ब्लॉक केले.” सोनालीचा किस्सा ऐकून सर्वचजण हसू लागले.

हेही वाचा : “३१ डिसेंबरच्या रात्री खूप दारु प्यायलो अन्…”, प्रियदर्शन जाधवने सांगितली आयुष्यातील कटू आठवण; म्हणाला, “त्या नाटकातून…”

दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दोन वर्षांपूर्वी कुणाल बेनोडेकर याच्याबरोबर लग्नगाठ बांधली. ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर कोरोना निर्बंध कमी झाल्यावर दोघांनीही कुटुंबीयांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात लग्न केले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonalee kulkarni reveals her first crush name and shared her funny date experience sva 00