मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पावसाळ्यातील वीकेंडला लोणावळ्याला जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पर्यटकांची गर्दी झाल्यास किंवा पावसाळ्यात दरड कोसळल्यास अनेकदा खंडाळा घाटात वाहतूक कोडींची समस्या निर्माण होते. याचा त्रास दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो. मुंबई-पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने खास सल्ला दिला आहे.
हेही वाचा : तमन्ना भाटियाच्या व्हायरल गाण्यावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “तरुणांना लाजवाल…”
इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिहिले आहे की, “जर तुम्ही पुणे ते मुंबई हा प्रवास करणार असाल तर कृपया करू नका! संपूर्ण घाट जाम आहे.” ही पोस्ट अभिनेत्रीने सोमवारी सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांनी शेअर केली आहे.
हेही वाचा : “…आणि आम्ही बंधनात अडकलो”, स्वानंदी टिकेकरचा साखरपुडा थाटात संपन्न, फोटो आला समोर
सोनालीने या पोस्टमध्ये पुणे-मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचा लहानसा व्हिडीओ या पोस्टमध्ये जोडला आहे. ती स्वत: या मार्गाने प्रवास करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. वाहतूक कोंडीत कोणीही अडकून राहू नये या उद्देशाने हा महत्त्वाचा सल्ला तिने आपल्या चाहत्यांना दिला आहे.
हेही वाचा : ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’, ‘सेक्रेड गेम्स’ गाजवणाऱ्या नवाजुद्दिन सिद्दिकीची पहिली कमाई किती होती माहिती आहे का?
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे रविवारी खंडाळा घाटात दरड कोसळली तसेच पुणे-मुंबई महामार्गावर सुद्धा अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर झालेला आहे. मध्यरात्रीपासून पुणे-मुंबई वाहतूक मंद गतीने सुरु आहे. ही धोकादायक दरड काढण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.