Actress Sonali Kulkarni New Car : ‘वो लड़की है कहाँ’ या गाण्याचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर पटकन येते ती म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. गेली दोन दशकं आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने सर्वांनाच भुरळ घातली आहे. मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात तिने आपलं अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. ‘दिल चाहता हैं’, ‘दोघी’, ‘गुलाबजाम’, ‘प्यार तुने क्या किया’ ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मानवत मर्डर्स’पर्यंत अशा विविधांगी प्रोजेक्ट्समधून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

वर्षाखेरीस अभिनेत्रीच्या घरी नव्याकोऱ्या आलिशान गाडीचं आगमन झालेलं आहे. सोनालीने मर्सिडीज-बेंझ ही गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्रीने गाडी खरेदी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनालीने शोरुममध्ये आपल्या कुटुंबीयांसह नव्या गाडीची पूजा केली. यावेळी अभिनेत्रीचं स्वागत करण्यासाठी सुंदर सजावट देखील करण्यात आली होती.

Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
sonu bhide aka Jheel Mehta wedding video
‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…
sairat fame marathi actor tanaji galgund girlfriend
‘सैराट’ फेम तानाजी गाळगुंडेच्या गर्लफ्रेंडने दिली प्रेमाची कबुली? अभिनेत्याबरोबरचा ‘तो’ फोटो पोस्ट करून लिहिलं….
Uttam Jankar On Mahayuti Government
Uttam Jankar : “तीन महिन्यांत राज्यातील सरकार पडणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय चर्चांना उधाण
singer armaan malik got married to aashna shroff
प्रसिद्ध बॉलीवूड गायकाने गुपचूप उरकलं लग्न; पत्नी आहे वयाने मोठी, विवाहसोहळ्याचे फोटो आले समोर

हेही वाचा : Video : “ही सीसीटीव्हीच…”, सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का? ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी आली मर्सिडीज-बेंझ

सोनाली कुलकर्णीने ( Sonali Kulkarni ) खरेदी केलेल्या कारचं नाव मर्सिडीज-बेंझचं जीएलसी असं आहे. हे नाव अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये नमूद केलेलं आहे. ही मर्सिडीज-बेंझ जीएलसी कार प्रवासासाठी अतिशय आरामदायी समजली जाते. २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात मर्सिडीज-बेंझचं हे नवीन एडिशन भारतात लॉन्च करण्यात आलं होतं.

फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, Mercedes-Benz GLC या गाडीची किंमत ७३.५० लाख ते ७४.५० लाख (एक्स शोरुम ) इतकी आहे. या कारचं बुकिंग १.५० लाखांची टोकन रक्कम देऊन करता येतं.

हेही वाचा : Video : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने नवीन वर्षाचे ‘असे’ केले स्वागत; रामशेज किल्ल्यावरून पतीसह दिल्या शुभेच्छा

हेही वाचा : Video : न्यू इअरच्या पार्टीतून बाहेर येताच अभिनेत्री जोरात पडली, पतीने सावरत नेऊन बसवलं गाडीत, व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, अभिनेत्रीच्या नव्या गाडीच्या फोटोंवर अक्षय केळकर, वैदेही परशुरामी या मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोनाली कुलकर्णीच्या ( Sonali Kulkarni ) वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती ‘मानवत मर्डर्स’ या थ्रिलर सीरिजमध्ये झळकली होती. यामध्ये तिच्यासह मकरंद अनासपुरे, आशुतोष गोवारीकर आणि सई ताम्हणकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. सोनालीने साकारलेल्या रुक्मिणीच्या भूमिकेला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली.

Story img Loader