मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सोनाली कुलकर्णीचे नाव नेहमीच आघाडीवर असते. ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी चाहत्यांशी कायम शेअर करत असते. नुकतेच सोनालीने काही फोटो पोस्ट करत यंदाची दिवाळी ती कशी साजरी करत आहे, हे चाहत्यांना दाखवले आहे. पण त्यावर काहींनी तिला टोमणेही मारले आहेत. त्यावर सोनालीने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोनूची भूमिका साकारणाऱ्या निधी भानुशालीवर चाहते नाराज, कारण…

Gautam Adani announces a donation of Rs 10,000 crore for social service to celebrate his son's wedding.
Jeet Adani Marriage : मुलाच्या विवाहानिमित्त गौतम अदाणी यांच्याकडून समाजसेवेसाठी दहा हजार कोटी रुपये
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Janhvi Kapoor
‘लवयापा’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जान्हवी कपूरने पोस्ट केले खुशीबरोबरचे सुंदर फोटो
A Pune driver installed an aquarium in auto rikshaw
‘पुणे तिथे काय उणे!’ रिक्षाचालकाने प्रवाशांसाठी रिक्षात काय ठेवले पाहा; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
us president donald trump on Mexican export tariffs
“अमेरिका गाझा ताब्यात घेईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; इस्रायलच्या पंतप्रधानांसमोरच मांडली स्पष्ट भूमिका!
Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
Viral Video Of Desi Jugaad
कामगाराला बाहेर काढण्यासाठी लावलं भन्नाट डोकं; Video तील जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘चुकूनही देशाबाहेर… ‘
Mumbai tempo driver and traffic police dispute over clicking picture of vehicle video viral
“कोणाला विचारून फोटो काढला?”, कांदिवलीत टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसांना विचारला जाब, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…

सोनाली कुलकर्णी ही दिवाळी दुबईत राहून साजरी करत आहे. तिचा नवरा कुणाल बेनोडेकर हा दुबईत स्थायिक असतो आणि सोनाली दिवाळीनिमित्त खास त्याला भेटण्यासाठी तेथे गेली आहे. यावेळी त्या दोघांचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कुणालने केशरी रंगाचा कुर्ता घातला आहे, तर सोनालीने केशरी रंगाची साडी नेसली आहे. या पारंपरिक लूकमधये ते दोघेही खूप छान दिसत आहेत. हे फोटो पोस्ट करताना सोनालीने लिहिले, “यंदा पहिल्यांदाच दिवाळी आमच्या घरी साजरी करत आहोत… माहेर नाही, सासर नाही आमचं घर. पूजेची सगळी तयारी, पूजा मांडणे, करणे, दिवाळीची सजावट, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर, अगदी दोन दिवसात, दोन माणसांत…आता हाच आमचा संसार.” यासोबतच सोनालीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि तसेच त्या दोघांनाही त्यांच्या कुटुंबियांची आठवण येत आहे, असेही तिने सांगितले.

सोनालीने हे फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी तिची सुंदर दिसण्यावरून, दुबईत एकटं राहून दिवाळी साजरी करण्यावरून प्रशंसा केली. तर दुसरीकडे काहींनी दुबईत दिवाळी साजरी करण्यावरून तिला टोमणे मारले. सोनालीच्या फोटोंवर “हा सण महाराष्ट्राचा आणि आपण कुठे…” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. त्याला सोनालीने सडेतोड उत्तर देत गप्प केलं आहे. तिने लिहिले, “आम्ही जिथे जातो तिथे महाराष्ट्राला घेऊन जातो, तिथे आपल्या संस्कृतीचा वारसा घेऊन जातो….” सोनालीच्या या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधले. सोनालीच्या या उत्तरावर कमेंट करत अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : Photos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”

दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. सोनाली आणि कुणाल यांनी २०२१ मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केले होते. पण त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने विधीवत लग्नगाठ बांधली.

Story img Loader