राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर आज (२८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निगडी प्राधिकरणमधील आकुर्डी परिसरातील तलावात गणपती विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे. सोनालीनेही आपल्या बाप्पाच या तलावात विसर्जन केलं. यावेळी सोनालीबरोबर तिचा भाऊही उपस्थित होता. सोनालीने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असं कॅप्शन दिलं आहे.
यावर्षी सोनालीने गणपती बाप्पाच्या माध्यमातून संत तुकोबांचे रूप साकारले आहे. गेल्या वर्षी काही कारणामुळे सोनाली गणपती उत्सव साजरा करू शकली नव्हती. त्यामुळे यावर्षी ती मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. सोनाली आणि तिचा भाऊ अतुल हा दरवर्षी इको फ्रेंडली गणपती साकारतात. गणपती बाप्पाच्या माध्यमातून तिने तुकोबांचे रूप साकारले होते.
हेही वाचा- अभिनय क्षेत्र गाजवणाऱ्या सई ताम्हणकरने युट्यूब चॅनेल का सुरु केलं?, म्हणाली…
यावर्षी महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये वरून राजाने कृपादृष्टी दाखवली नाही. अनेक भागात दुष्काळाचे सावट आहे. महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडावा आणि बळीराजा सुखी व्हावा असं साकडं सोनालीने गणपती बाप्पा चरणी घातलं होतं. गेल्या वर्षी सोनालीच्या आजीचं निधन झालं होतं त्यामुळे तिने गणपती उत्सव साजरा केला नव्हता. यावर्षी गणेशोत्सव साजरा करत तिने गणपती बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती आजीला समर्पित केली होती.