ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज १० वा स्मृतिदिन आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा खून झाला होता. दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पोस्ट केली आहे. १० वर्षे झाली पण वेदना अजूनही ताजीच आहे, असं सोनालीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जेव्हा सर्वांसमोर रजनीकांत यांच्या तोंडावर थुंकल्या होत्या श्रीदेवी; काय घडलं होतं? वाचा
“१० वर्षं झाली..
वेदना ताजीच आहे अजून..
अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द ऐकून काहीजण दुखावतात.. दुसऱ्या माणसांची, राज्यांची, धर्मांची अंधश्रद्धा दिसत नाही का असं म्हणतात..
दिसते ना.. दिसतेच..
पण आपल्याला जर कोणी चेतावणी देत असेल की पूर येणार आहे.. किंवा भूकंप होणार आहे.. तर आपण स्वतःला वाचवू – की सांगणाऱ्यावरच चिडू – तू शेजारच्या गावाला सांग आधी म्हणून..?
शहाणं होणं हा पर्याय आहे आपल्यासमोर.. तो निवडूया.
आपल्या देवावरच्या विश्वासाला कोणीही नाकारू शकत नाही. तो आपला हक्क आहे. पण त्यापायी होणारी पिळवणूक आणि सोयीस्करपणा दोन्ही घातक आहेत ह्याची जाणीव ठेवूनच पुढचं पाऊल उचलूया..
डॅा. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन..”, अशी पोस्ट सोनाली कुलकर्णीने केली आहे.
दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ रोजी कट्टरवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. या घटनेने सगळं राज्य हादरलं होतं. दाभोलकर हत्येचा खटला पुण्यातल्या विशेष सीबीआय न्यायालयात सुरू आहे. सनातन या संस्थेच्या पाच जणांच्या विरोधात या संबंधीचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.