सोनाली कुलकर्णी ही गेले अनेक दिवस तिच्या आगामी ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ‘व्हिक्टोरिया’ एक हॉरर चित्रपट असणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. अंगावर काटा आणणाऱ्या या ट्रेलरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विराजस कुलकर्णी आणि जीत अशोक यांनी मिळून केला आहे. अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला विराजस कुलकर्णी हा या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट आज म्हणजेच १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र प्रदर्शनाच्या प्रक्रियेदरम्यान आलेल्या काही अडचणींमुळे निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचं ठरवलं आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Special local trains on New Year Local trains will run at night on Central and Western Railways
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात

आणखी वाचा : स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या एका भागासाठी आकारतो ‘इतके’ मानधन, किंमत ऐकून व्हाल थक्क

सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावरून माहिती दिली. तिने या चित्रपटाचा एक नवीन टीझर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या नव्या टीझरबरोबर कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “व्हिक्टोरिया हा मोठ्या स्क्रीनच्या अनुभवासाठी बनलेला चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त शोज सह आणि इतर कोणत्याही संघर्षां शिवाय प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आमचे ध्येय आहे आणि याच दृष्टिकोनातून आम्ही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत आहोत. व्हिक्टोरियाचे रहस्य आता १३ जानेवारी २०२३ ला उलगडणार… रसिक प्रेक्षकहो असेच प्रेम असू द्या!”

हेही वाचा : Video: भूताने पछाडलेल्या हॉटेलमधून कसे बाहेर पडणार आशय-सोनाली? बहुप्रतीक्षित ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

आजच्याच दिवशी ‘अवतार २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा संपूर्ण जगभर बोलबाला आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून रेकॉर्डब्रेक कमाई केली. महाराष्ट्रातही हा चित्रपट भरपूर स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळेच ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाला स्क्रीन्स मिळण्यात अडचण आल्याचं बोललं जात आहे. आता हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच १३ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

Story img Loader