‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. मराठीसह इतर भाषिक ट्रेलरवर या अनेकांनी लाखो प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी आणि हिंदी ट्रेलरला युट्यूबवर अवघ्या काही तासांतच २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ट्विटरवरही हजारो ट्विट्समुळे तो प्रथम क्रमाकांवर ट्रेंड असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांप्रमाणेच अनेक दिग्गज कलाकारांनाही या चित्रपटाने भुरळ घातली आहे. या कलाकारांमध्ये दक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती याचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : रणवीर सिंगने मुंबईच्या रस्त्यावर दाखवली त्याच्या ऍस्टन मार्टिन गाडीची झलक, किंमत वाचून व्हाल थक्क

सुपरस्टार विजय सेतुपतीने या चित्रपटाचा तामिळ ट्रेलर आपल्या ट्विटर हॅंडलवरून शेअर करत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्वीटमध्ये लिहिले, “मला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर तुमच्याशी शेअर करण्यात आनंद होत आहे. संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा!” विजयच्या या ट्वीटला अनेकांनी प्रतिक्रिया देत रिट्विटही केले आहे.

अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेल्या या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता शरद केळकर हा बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. त्यासोबतच अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा : विजय सेतुपतीच्या ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार महत्वपूर्ण भूमिका

‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून भारतभरात प्रदर्शित होत आहे. सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स आणि झी स्टुडियोजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South superstar vijay sathupathi shared trailer of har har mahadev film rnv