अभिनेत्री स्पृहा जोशी व अभिनेता आदिनाथ कोठारे हे दोघे देखील मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. स्पृहा व आदिनाथने आपल्या अभिनयाचा ठसा मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत उमटवला आहे. लवकरच दोघं पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मोशनस्केप एंटरटेनमेंट निर्मित आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘शक्तिमान’ या नव्या चित्रपटातून स्पृहा जोशी व आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. २४ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात स्पृहा व आदिनाथ व्यतिरिक्त अभिनेता प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे, विक्रम गायकवाड महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. काल, १३ मेला आदिनाथ कोठारेच्या वाढदिवशी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
‘शक्तिमान’ चित्रपटात आदिनाथने सिद्धार्थची भूमिका साकारली असून स्पृहा त्याच्या बायकोच्या भूमिकेत झळकली आहे. एका सामान्य व्यक्तीची असामान्य गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कुटुंबाच्या विरोधात सगळ्यांच्या मदतीला धावू जाणारा सिद्धार्थ पाहायला मिळत आहे. शिवाय हृदयाचा आजार असलेल्या मुलीचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी धडपड करताना सिद्धार्थ दिसत आहे. ‘शक्तिमान’चा चित्रपटाचा हा ट्रेलर आदिनाथने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“‘शक्तिमान’- आपल्या सगळ्यांच्यात दडलेला असतो एक सुपरहिरो. त्याला योग्यवेळी स्वतःमध्ये शोधावं लागतं. अगदी आपल्या बाबांसारखं! सामान्यांतील असामान्यत्व दाखवणारी…आपल्या आजूबाजूला घडू शकणारी गोष्ट…आपल्या घरातली गोष्ट ‘शक्तिमान’ २४ मे पासून सिनेमागृहात…”, असं कॅप्शन लिहित आदिनाथने ‘शक्तिमान’चा ट्रेलर शेअर केला आहे.
हेही वाचा – ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वर्णी, टायगर श्रॉफच्या बहीणसह झळकणार ‘हे’ ११ सदस्य
‘शक्तिमान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून इतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदे, फुलावा खामकर, मंजिरी ओक, दीप्ती लेले, माधव देवचके अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खूप सुंदर कथा आणि पटकथा…चित्रपट पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अप्रतिम विषय. ट्रेलर भन्नाट आहे. मी चित्रपटगृहात जाऊन नक्की बघेन माझ्या बायको मुलांसहित…मला ट्रेलर आवडला.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ट्रेलर पाहूनचं अंगावर काटे आले.”
दरम्यान, ‘शक्तिमान’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी आजवर वेगवेगळ्या विषयांवर बरेच चित्रपट केले आहेत. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘अँड जरा हटके’, ‘हंपी’ आणि ‘सायकल’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. आता त्यांचा ‘शक्तिमान’ चित्रपट २४ मेला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे स्पृहा जोशी व आदिनाथ कोठारे या फ्रेश जोडीच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.