मराठी मनोरंजनसृष्टीत स्पृहा जोशीला उत्तम अभिनेत्री, निवेदिका व कवयित्री म्हणून ओळखलं जातं. चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिच्या कविता व अभिनय शैलीप्रमाणेच स्पृहाचं सूत्रसंचालन मराठी प्रेक्षकांना विशेष भावतं. यामुळेच अभिनेत्रीला राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील विशेष कार्यक्रमात निवेदन करण्याची संधी मिळाली. याबद्दलची खास पोस्ट स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू झालेलं आहे. या अधिवेशनादरम्यान एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं निवेदन अभिनेत्री स्पृहा जोशीने केलं. यावेळी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि महेश काळे यांनी गाण्यांचं सादरीकरण केलं.
हेही वाचा : काजोलने पाहिला माधुरी दीक्षितच्या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर, प्रतिक्रिया देत म्हणाली…
स्पृहा याबद्दल लिहिते, “नागपूरला हिवाळी अधिवेशनादरम्यान सगळ्या मान्यवर आमदारांसाठी आशिष शेलार यांनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी मला ‘स्वरोत्सव’ या मैफिलीचं निवेदन करण्याची संधी मिळाली. राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या गायनाने आम्ही सगळे प्रेक्षक भारावून गेलो होतो. धन्यवाद श्रीरंग गोडबोले मला ही संधी मला दिल्याबद्दल खूप आभार!”
हेही वाचा : “माझ्या नवऱ्याने…” ‘लस्ट स्टोरीज २’मधील इंटिमेट सीनबद्दल अमृता सुभाषचा खुलासा; म्हणाली, “आम्ही दोघंही…”
दरम्यान, स्पृहा जोशीने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाविश्वातील कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायाचं झालं, अलीकडेच तिचा ‘सब मोह माया है’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये स्पृहाने ‘थ्री इडियट’ फेम अभिनेता शरमन जोशीबरोबर स्क्रीन शेअर केली होती.