नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात अभिनेत्री स्पृहा जोशीनं आपल्या अभिनयानं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. मराठी, हिंदी या दोन्ही भाषांमध्ये तिनं काम केलं आहे. तसेच अभिनयाशिवाय स्पृहा उत्तम निवेदक, कवयित्री आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीची बहीण भारतातील प्रसिद्ध खेळाडू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याविषयी स्पृहा जोशींने अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिले के करीब’ कार्यक्रमात सांगितलं. तिला विचारलं गेलं होतं की, ‘तुला एक बहीण आहे ना? ती काय करते?’ यावर स्पृहा जोशी म्हणते, “हो. मला धाकटी बहीण आहे. तिच एक वेगळंच पूर्ण करिअर आहे. ती खेळाडू आहे. जेव्हा २०१० साली दिल्लीत कॉमनवेल्थ गेम (राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा) झालं तेव्हा ती इंडियन ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्सची कॅप्टन होती.”

हेही वाचा – Video: ‘रंग माझा वेगळा’मधील दीपा आणि ‘स्वाभिमान’ मालिकेतील पल्लवीमध्ये ‘या’ गोष्टीमुळे होतात सतत भांडणं, म्हणाल्या…

पुढे अभिनेत्रीनं सांगितलं की, “जवळपास तिनं १५-२० यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं आहे. राष्ट्रीय पातळीवर तिच्या चॅम्पियनशिपचा रेकॉर्ड आहे. तिच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तिला शिव छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये क्षिप्रा जोशी हे खूप नावाजलेलं नाव आहे. ती ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वात तरुण परीक्षक आहे. ती जागतिक पातळीवर परीक्षण करायला जाते. तसेच तिच्याकडे शिकत असलेल्या मुली आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहे.”

हेही वाचा – मिरा जगन्नाथनं सोडली ‘ठरलं तर मग’ मालिका; आता साक्षीच्या भूमिकेत दिसली ‘ही’ अभिनेत्री

हेही वाचा – भारतीय जवान आहे किरण मानेंचा जबरा फॅन; अभिनेते अनुभव सांगत म्हणाले, “काळीज…”

दरम्यान स्पृहा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘लोकमान्य’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. पण काल या मालिकेचा शेवट भाग प्रसारित झाला. असे असले तरी तिचे ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाचे प्रयोग सुरू आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spruha joshi sister kshipra joshi has note her name in guinness world records pps