मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार एकमेकांचे खूप खास मित्र आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्यात देखील गेली अनेक वर्षे घट्ट मैत्री आहे. दोघांनी यापूर्वी ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ अशा चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. सध्या सिद्धार्थ-सईच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रेक्षकांना या दोघांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थ सईबरोबर असलेल्या मैत्रीबद्दल सांगताना म्हणाला, “सई माझी खूप जवळची मैत्रीण आहे. जर आयुष्यात कधीही मी हवेत गेलो किंवा डोक्यात हवा जाणं जो असा प्रकार असतो…तो प्रकार कलाकारांच्या बाबतीत घडण्याची दाट शक्यता असते. असं जर माझ्याबरोबर घडलं मी हवेत गेलो, तर ही एकमेव व्यक्ती आहे जी मला बरोबर सरळ करेल.”

tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
aishwarya narkar dances on 56 years old bollywood song kajra mohabbat wala
“कजरा मोहब्बत वाला…”, ५६ वर्षे जुन्या गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा सुंदर डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, कमेंट्सचा पाऊस

हेही वाचा : …अन् क्रांती रेडकरच्या लेकीला कोसळलं रडू! अभिनेत्रीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, नेमकं काय घडलं?

“मी हवेत गेलो तर, सई मला जमिनीवर अलगद नाहीतर थोबाडून जमिनीवर फेकू शकते की, बास आता खूप उडलात हवेमध्ये…आता तू जसा आहेस तसा हो! हे स्पष्टपणे सांगण्यासाठी कोणीतरी माझ्या आयुष्यात आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. ही मैत्री अशीच टिकवण्यासाठी मला सईला रोज भेटायची गरज नाही. अनेकदा आम्ही ३ किंवा ६ महिन्यांनी भेटतो. त्यामुळे असं रोज नाही भेटलो तरीही आमची मैत्री तशीच आहे.” असं सिद्धार्थने सांगितलं.

हेही वाचा : Bigg Boss 17: अंकिता लोखंडेच्या समर्थनात उतरली सुशांत सिंह राजपूतची बहीण, म्हणाली, “अंकी तू…”

दरम्यान, श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटात सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकरसह यामध्ये सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोनेस वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader