रेश्मा राईकवार‘

श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट मजेशीर आहे. लग्न आणि प्रेमाबद्दलच्या भ्रामक कल्पनांवर जाता जाता शहाणपणाच्या न पेक्षा व्यावहारिक गोष्टींचा उतारा देण्याचा प्रयत्न करणारा आहे. थोडक्यात मनोरंजनाचे सर्वसमावेशक घटक असलेला आणि ‘मन करा रे प्रसन्न’च्या धर्तीवरचा निखळ करमणूकप्रधान चित्रपट आहे. प्रेम आणि लग्नसंस्थेचे आजच्या काळातील संदर्भ इतक्या वेगाने बदलत जात असताना तरुणाईचा त्याबद्दलचा दृष्टिकोन मांडणारे चित्रपट पाहणं ही मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे.  ‘श्रीदेवी प्रसन्न’ची कथा मांडताना सध्या वास्तव जीवनातही शहरी आणि ग्रामीण तरुण ही मानसिकता पुसट होत चालली आहे याचं भान ठेवत लेखिकेने कथा लिहिली आहे. गावाकडे वाढलेली, तिथेच शिक्षण घेतलेली-नोकरी करणारी तरुणाई आणि शहरातील तरुणाई यात तसं फरक करतायेण्याजोगं अंतर आज उरलेलं नाही. ते इतर आर्थिक, सामाजिक बाबींमध्ये असू शकेल कदाचित.. मात्र जीवनशैली आणि एकूणच व्यक्तिमत्व, वैचारिक – बौद्धिक समज याबाबतीत वेगळं काढावं असं कमी-जास्त राहिलेलं नाही. त्यामुळेच चित्रपटाची नायिका श्रीदेवी ही वेंगुल्र्यात जन्मलेली, तिथेच कुटुंबाबरोबर राहणारी, कुडाळच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करणारी आहे. नायक प्रसन्न हा मुंबईतला, आयटी क्षेत्रातील आहे. 

Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

हेही वाचा >>> Sur Lagu De Review : चांगल्या विषयाची मांडणी

श्रीदेवीची व्यक्तिरेखा आणि तिचं कुटुंब हे नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळेपण राखणारं आहे. आजी-आजोबा, आई-बाबा सगळयांचा प्रेमविवाह असल्याने श्रीदेवीवरही तिने प्रेमविवाहच केला पाहिजे असं दडपण आहे. श्रीदेवीलाही लग्न करायची मनापासून इच्छा आहे, पण प्रेमात पडावं असं तिला कोणी सापडलेलं नाही तर त्याच्या उलट कथा प्रसन्नची आहे. प्रसन्नची चार प्रेमप्रकरणं झाली आहेत. त्याला लग्न करायची फारशी इच्छा नाही किंवा लग्न का करायचं? याबाबतीतही त्याचं स्वत:चं असं काहीच मत नाहीये. मात्र त्याने लवकर लग्न करावं म्हणून घरचे त्याच्या मागे लागले आहेत. दोघंही ऑनलाइन विवाह जुळवून आणणाऱ्या संकेतस्थळाचा आधार घेतात आणि एकमेकांसमोर उभे ठाकतात. पुढे त्यांचं काय होतं हे चित्रपटात पाहणंच मजेशीर आहे. अगदी छोटया छोटया गोष्टींमधून तरुण पिढीच्या वागण्याचे-बोलण्याचे संदर्भ अदिती मोघे यांनी टिपले आहेत. दिग्दर्शक विशाल मोढावे यांनीही त्या जागा सिनेमात सुंदर पकडल्या आहेत. पहिल्याच भेटीत श्रीदेवीला साडीत पाहिल्यानंतर प्रसन्नने हाय-हॅलोऐवजी नमस्कार करणं असो वा ती गावात राहते म्हटल्यानंतर तिथल्या जीवनाबद्दल असलेल्या ऐकीव ज्ञानातून प्रसन्नने खुळचटासारखे प्रश्न विचारणं असो.. या दोघांचे स्वभाव, वैचारिक अंतर, समज यात मूलत: असलेला फरक आणि त्यातून त्यांच्या धारणा तयार झालेल्या असल्याने एकत्र आल्यानंतरही त्यांचं एकत्र न येणं, एकमेकांना समजून घेण्यासाठी सुरू असलेली धडपड हा सगळा भाग खूप सुंदर पडद्यावर उतरला आहे. प्रेमकथा आहे, त्यामुळे गाण्यांचा भडिमार असला पाहिजे हाही अट्टहास चित्रपटात दिसत नाही.

हेही वाचा >>>अनंत महादेवन यांच्या चित्रपटाची घोषणा

चित्रपटातील पात्ररचना आणि कलाकारांची निवड यामुळे अभिनयाच्या बाबतीत चित्रपट खरोखरच पर्वणी ठरला आहे. संवादही चुरचुरीत आहेत. अर्थात, इथे श्रीदेवीच्या घरच्यांना झुकतं माप आहे त्यामुळे त्यांच्यावर रोख अधिक आहे, त्या तुलनेत प्रसन्नच्या आई-वडिलांची बाजू दुर्लक्षित राहिली आहे. प्रसन्नचा मित्र, त्याची बायको आणि नंतर कथेतलं नाटय वाढवण्यासाठी झालेला व्हायोलिनचा प्रवेश या सगळया गोष्टी वाढीव आहेत हे लक्षात आल्याशिवाय राहात नाही. अनेक ठिकाणी श्रीदेवीच्या व्यक्तिरेखेला असलेली स्पष्टता प्रसन्नच्या उपजत गोंधळलेपणाच्या लेबलखाली त्याच्या वाटयाला कणभरही येत नाही. उत्तम छायाचित्रण आहे. निर्मितीमूल्य आणि दिग्दर्शनातील सफाईही जाणवते. सिध्दार्थ चांदेकर, सई ताम्हणकर या दोघांच्याही अप्रतिम अभिनयामुळे गोष्ट खऱ्या अर्थाने रंगली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण सुलभा आर्य, संजय मोने, समीर खांडेकर, शुभांगी गोखले असे सरस कलाकार चित्रपटात आहेत. त्यांच्याबरोबर या जोडीची काही दृश्यं, कौटुंबिक पातळीवरचाही त्यांचा सहभाग अधिक असता तर अजून बहार आली असती. त्याऐवजी पूर्वार्धात श्रीदेवी आणि प्रसन्नच्या गोवा सफरीत आपण रेंगाळत राहतो. उत्तरार्धात चित्रपटाने जो वेग पकडला आहे तो पहिल्यापासूनच राखता आला असता तर अधिक मजा आली असती. एकूणच मांडणीतला ताजेपणा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे हा चित्रपट मन प्रसन्न करून जातो.

श्रीदेवी प्रसन्न

दिग्दर्शक – विशाल मोढावे कलाकार – सिद्धार्थ चांदेकर, सई ताम्हणकर व अन्य.

Story img Loader