नुकत्याच झालेल्या महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित असा ‘स्थळ’ (Sthal) चित्रपट ७ मार्चला प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती, त्यामुळे अनेकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आता चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांकडून या चित्रपटाचे कौतुक केलं जात आहे. ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन यांनीदेखील ‘स्थळ’ (Sthal) चित्रपटाविषयी गौरवोद्गार काढले आहेत.

मधुराणी प्रभुलकरकडून ‘स्थळ’चं कौतुक

जया बच्चन यांच्याबरोबरच अनेक मराठी कलाकारदेखील ‘स्थळ’चे (Sthal) कौतुक करताना दिसत आहेत. अशातच ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने (Madhurani Prabhukar) ‘स्थळ’ या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. मधुराणीने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या पोस्टरबरोबरची खास पोस्ट शेअर केली आहे आणि या चित्रपटाविषयीच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मधुराणी प्रभुलकरकडून ‘स्थळ’ पाहण्यासाठी आवाहन

मधुराणी (Madhurani Prabhukar) सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. त्याचबरोबर ती कामानिमित्तची माहितीदेखील शेअर करत असते. अशातच तिने नुकताच ‘स्थळ’ चित्रपट पाहिला असून याबद्दलची विशेष पोस्ट शेअर केली आहे. तसंच हा चित्रपट पाहण्यासाठी तिने चाहत्यांना आवाहनदेखील केलं आहे.

मधुराणी प्रभुलकर नेमकं काय म्हणाली?

मधुराणीने (Madhurani Prabhukar) इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चित्रपटाविषयी असं म्हटलं आहे की, “‘सिस्टम’ला (व्यवस्था) दिलेली एक जोरदार चपराक. ‘स्थळ’ (Sthal) चित्रपट पाहणे आवश्यक आहे. मला निर्मात्यांचा आणि संपूर्ण टीमचा खूप अभिमान आहे.” अशा मोजक्या पण अचूक शब्दांत त्यांनी चित्रपटाविषयी मत मांडलं आहे. शिवाय चित्रपटाचे निर्माते व कलाकारांचा अभिमान असल्याचंदेखील म्हटलं आहे.

अनेक मराठी कलाकारांकडूनही ‘स्थळ’चं कौतुक

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी ‘स्थळ’ (Sthal) चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. जया बच्चन यांच्यासह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, जयंत वाडकर, स्वप्नील जोशी, मधुर भांडारकर, प्रथमेश परब, अशोक सराफ, अवधूत गुप्ते अशा अनेक मराठी कलाकारांनी ‘स्थळ’चं कौतुक करत प्रेक्षकांना हा चित्रपट बघण्यासाठी आवाहन केलं आहे.

‘स्थळ’ चित्रपटात नवोदित कलाकारांचा दमदार अभिनय

दरम्यान, ‘ॲरेंज्ड मॅरेज’ या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अनोखी गोष्ट ‘स्थळ’ (Sthal) या चित्रपटातून दाखवली आहे. जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित या चित्रपटात नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी आणि मानसी पवार या नवोदित कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे.

Story img Loader