प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

दिग्पाल लांजेकर हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी एका रेडिओ चॅनलने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना स्वाभिमान आणि अभिमान याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सविस्तर भाष्य केले.
आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटाच्या पोस्टरवर झळकला ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनेता, सोहम बांदेकर म्हणाला “भावा…”

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

“अभिमानाचा दुराभिमान होऊ नये. स्वाभिमान असायला हवा. मी मराठी चित्रपट पहिल्यांदा पाहणार का? तर हो कारण तो स्वाभिमानाचा भाग आहे. कारण ती माझी भाषा आहे”, असे दिग्पालने म्हटले.

“मराठी संस्कृतीचा अभिमान असायला पाहिजे. मराठीच छान आहे, पण हे वाईट आहे, ते वाईट आहे, अशाप्रकारे दुराभिमान नसायला हवा. त्यावेळी मग मराठी वाईट आहे हे मी ऐकून घेणार नाही. अभिमान आणि स्वाभिमान या दोन्हीही गोष्टी असायला हव्या. दुर्देवाने मराठी माणसाकडे त्याच नाहीत. मला याबद्दल फार वाईट वाटतं”, अशी खंतही दिग्पाल लांजेकरने व्यक्त केली.

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…” अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण, म्हणाला “आई माझ्यावर…”

दरम्यान ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader