दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेले तीन आठवडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे या चित्रपटाने यशस्वीरित्या चौथ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. ‘श्री शिवराज अष्टक’ या दिग्पाल यांच्या अनोख्या संकल्पनेतील ‘सुभेदार’ हे पाचवं चित्र पुष्प आहे. यापूर्वी ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ हे चार चित्र पुष्प प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. आता ‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकर मराठवाड्याच्या संघर्षाची कथा मांडणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट, स्वरा मल्हार कामत नाही तर…; पाहा नवा प्रोमो

‘मुक्तिसंग्राम: कथा मराठावड्याच्या संघर्षाची’ या नाट्य माहितीपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नाट्य माहितीपटाचा शुभारंभ झाला असून सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची ही निर्मिती आहे.

हेही वाचा – “ती जागा हाफ चड्डीची नाही”, गणेश भक्तांसाठी जारी केलेल्या ड्रेसकोडवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्रात…”

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या नाट्य माहितीपटात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अक्षय वाघमारे आणि ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील अभिनेत्री पूजा पुरंदरे पाहायला मिळणार आहेत. अक्षयने या नाट्य माहितीपटाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच या माहितीपटाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

हेही वाचा – Video: अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंच्या आठवणींना दिला उजाळा; म्हणाले, “दादा एक…”

हेही वाचा – Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरांनी केलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चं नवीन व्हर्जन पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

माहितीपटाची वैशिष्ट्ये…

१. ‘मुक्तिसंग्राम: कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ हा डॉक्यु ड्रामा प्रकार आहे. म्हणजेच उपलब्ध कागदपत्रे आणि नाट्यरूपांतर यांची योग्य पद्धतीने सांगड घालून तयार केलेला माहितीपट.

२. खालील उपलब्ध पुस्तके, संदर्भ यांचा सखोल अभ्यास करून संहिता लिहिली आहे.
सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा.

३. ब्रिटिशकालीन वृत्तवाहिन्यांवरील मूळ उपलब्ध व्हिडिओंचा अभ्यास करून त्याचा योग्य पद्धतीने वापर केला आहे.

४. केवळ १२ दिवसांत हा ७५ मिनिटांचा माहितीपट तयार करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhedar director digpal lanjekar new project coming soon based on marathwada mukti sangram pps