लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘सुभेदार’मुळे चर्चेत आहेत. ‘श्री शिवराज अष्टक’ या त्यांच्या अनोख्या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ हे चार ऐतिहासिक चित्रपट केले. त्यानंतर आता पाचवा ‘सुभेदार’ चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या दिग्पाल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशातच एका चाहत्यानं दिग्पाल यांना एक खास सरप्राइज दिलं. याचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

हेही वाचा – “माझ्या कुटुंबात मी फक्त एकटाच देसाई आहे”; मंगेश देसाई यांनी सांगितलं आडनावामागचं रहस्य; म्हणाले…

hrithik roshan saba azad Sussanne Khan
हृतिक रोशन-सबा आझादच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण, अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टवर पूर्वाश्रमीची पत्नी कमेंट करत म्हणाली…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
praful patel on raj thackeray ladki bahin statement
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”
Jagan Mohan Reddy
Tirupati Laddu Row : “आधी धर्म सांगा मग तिरुपतीचं दर्शन घ्या”, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती दर्शनाचा बेतच रद्द केला
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
manoj jarage patil pc
“देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी, त्यानंतर…”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा!
district water conservation officer issue notice to three contractors over poor canal work
चंद्रपूर : लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कंत्राटदारांना नोटीस; कारण काय?

दिग्पाल लांजेकर यांना चाहत्याकडून मिळालेलं खास सरप्राइज म्हणजे गोड शिरा आणि एक चिठ्ठी. याचा त्यांनी फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “कधी कधी आपण केलेल्या कामाची विलक्षण पावती मिळते. आज पुण्याहून मुंबईला जात असताना फूड मॉलवर थांबलो. नाश्ता होईपर्यंत अचानक गोड शिऱ्याच्या डिशेस सर्व्ह केल्या गेल्या. आम्ही हे ऑर्डर केलं नाही हे म्हणेपर्यंत स्वतः मॅनेजर आला आणि त्यानं कुणीतरी हे तुमच्यासाठी ऑर्डर केलं आहे, असं हसतमुखानं सांगत ही छोटीशी चिठ्ठी हातात ठेवली. त्यावरचा अगदी मनापासून लिहिलेला हा साधा सरळ संदेश वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं.”

“कुणा अज्ञात मावळ्याचं हे प्रेम. आज मी हे केलं, ते केलं म्हणून श्रेय घेण्यासाठीची धडपड मी अनेकदा पाहिली आहे. अशावेळी प्रेम व्यक्त करून त्याचं समाधान मनात घेऊन समोरही न येणारी ही व्यक्ती चेहरा नसतानाही मनात कायम घर करून राहील. त्यांच्या या बळ वाढवणाऱ्या अनाम प्रेमाचे आभार सामाजिक माध्यमातून मानतो आहे, कारण ते त्यांच्यापर्यंत पोचतील याची खात्री आहे. तुम्ही रसिक मायबाप ‘श्री शिवराज अष्टक’ पूर्ण करण्यासाठी असेच पाठिशी उभे राहाल ही खात्री आहे… जय शिवराय,” असं दिग्पाल यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा – “…म्हणून क्रांती नाव ठेवलं”; अभिनेत्रीनं स्वतः सांगितला यामागचा किस्सा

हेही वाचा- “एक वेळ बॉलीवूडमध्ये जुनी गाणी रीमिक्स करणं थांबेल पण….”, सलील कुलकर्णींचा संताप; म्हणाले, “हायवेवर…”

दिग्पाल यांच्या या पोस्टवर त्यांच्या इतर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, “भारतात आणि भारता बाहेरही असे करोडो मावळे आहेत दिग्पाल दादा. कुणीतरी साद घालायचा अवकाश हो. तुम्ही साद घातली, तुम्हाला प्रतिसाद तेवढाच येणार. ।। जय शिवराय ।। आता आतुरता ‘सुभेदार’ची.” तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं आहे की, “खूप खूप धन्यवाद दादा, आम्हा मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान विचारांचे आणि त्यांच्या अविश्वसनीय कार्याचे साक्षीदार होण्याची संधी तुम्ही सर्वांनी दिली. मनःपूर्वक धन्यवाद; जय भवानी जय शिवराय!”

हेही वाचा – “…याचं शल्य मनात नक्कीच आहे”; केदार शिंदेंच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “सैराट….”

दरम्यान, दिग्पाल यांच्या आगामी ‘सुभेदार’ चित्रपटात मुख्य भूमिका म्हणजेच तानाजी मालुसरेंची भूमिका अभिनेता अजय पुरकरनं साकारली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पुन्हा चिन्मय मांडलेकर दिसणार आहे; तर जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी पाहायला मिळणार आहेत.