लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चर्चा सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या अष्टकातील पाचवं चित्र पुष्प म्हणजे ‘सुभेदार’ चित्रपट कालच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून दिग्पाल यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा मांडली आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटात प्रत्येक कलाकारानं दमदार काम केलं आहे. यामुळे सध्या त्याचं कौतुक होतं आहे. अशातच या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका निभावणारे अभिनेते अजय पुरकर यांच्या एका वक्तव्यानं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – प्रसाद ओकच्या ‘या’ आगामी चित्रपटात झळकणार गौरव मोरे; फिल्टरपाड्याच्या बच्चनने स्वतः केला खुलासा

सध्या ‘सुभेदार’मधील कलाकार मंडळी या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखती दरम्यान अजय पुरकर यांनी मराठी माणसानं कोणती गोष्ट अंगी बाळगली पाहिजे आणि कोणती गोष्ट सोडली पाहिजे? या प्रश्नाचं असं काही उत्तर दिलं; जे सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

हेही वाचा – Video: ‘सुभेदार’बद्दल प्रेक्षकांच्या ‘त्या’ कृतीमुळे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नाराज; म्हणाले, “तुम्ही सगळे…”

अजय पुरकर म्हणाले की, “मराठी माणसानं मला असं वाटतं, काम आणि व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र सोडला पाहिजे. खूप कमी मराठी माणसं आहेत, जे इतर भाषा बोलतात. पुण्यात मी लहान असताना सदाशिव पेठेत दोन सरदारजी बंधू होते, जे कार पेंटरी करायचे. फोनवर बोलशील तर तू ओळखून दाखव ते सरदारजी आहेत, अशी त्यांची मराठी आहे.”

हेही वाचा – Jaane Jaan: करीना कपूरचं ओटीटीवर दमदार पदार्पण; थ्रिलर चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका, टीझर आला समोर

पुढे अजय म्हणाले की, “जेव्हा तुम्हाला बंगळुरूला जायचं असेल, तेव्हा कन्नड शिका. कारण ज्यावेळेस भाषा शिकता त्यावेळेस खूप फरक पडतो. आपण बाहेर पडल्यानंतर ती भाषा शिकत नाही. आज आपण ग्लोबल लाइजेशनच्या कन्सेप्ट खाली आहोत. त्यामध्ये कुठलाही माणूस कुठेही जाऊ शकतो आणि कुठलाही माणूस कुठेही काम करू शकतो. याचा मराठी माणसानं फायदा घेतला पाहिजे.”

हेही वाचा – व्याख्यानं फुकट देण्याच्या मागणीवर अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “मी मेलो तरी…”

दरम्यान, अजय पुरकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचही पुष्पात महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. ‘सुभेदार’ पूर्वी ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटामधील अजय पुरकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली होती. चित्रपटांव्यतिरिक्त अजय यांनी मालिकांमधूनही दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhedar fame actor ajay purkar advised the marathi people pps
Show comments