अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या त्यांच्या आगामी ‘सुभेदार’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून चिन्मय पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सध्या चिन्मय या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच त्यानं भावी दिग्दर्शकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “आपण एकत्र मिळून बदलू शकतो”, शिव ठाकरेनं जुहू बीचवर केली साफसफाई, व्हिडीओ आला समोर

आगामी चित्रपटानिमित्तानं चिन्मयनं एका रेडिओ चॅनेलला अलीकडेच मुलाखत दिली. त्यावेळी त्याला विचारलं की, ‘जर तुम्ही चांगले लेखक असालं तर तुम्हाला चांगला अभिनेता, मग दिग्दर्शक, निर्माता किंवा गायक होणं तुलनेनं सोप जातं?’ यावर चिन्मय म्हणाला की, “मी असं म्हणणार नाही. कारण प्रत्येक लेखकाला अभिनय येईल, असं नाही. खूप चांगले लेखक आहेत, ज्यांना स्वतःचं स्क्रिप्ट सुद्धा नरेट (कथन) करता येत नाही. कारण त्यांना परफॉर्मन्सचं आणि नरेशन करण्याचं कौशल्य नसतं. हे येत म्हणून ते येईलचं असं नाही.”

हेही वाचा – लावणीविषयी बोलताना लोकप्रिय दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी व्यक्त केली खंत, म्हणाले…

पुढे चिन्मय म्हणाला की, “पण एक कलाकार आणि एक अभिनेता म्हणून तुम्ही इतर कलेचं कौतुक केलं पाहिजे, याची तुम्हाला मदत होते. तू जर माझ्या डोक्यावर बंदूक ठेवलीस आणि सांगितलंस चित्र काढ. तर मी म्हणेण, तू मला गोळी मार. मला चित्र काढता येत नाही. पण मी आर्ट गॅलरीमध्ये चित्र चांगलं बघू शकतो. ते मला येत आणि हल्ली इंटरनेटमुळे हे खूप सहज शक्य झालं आहे.”

हेही वाचा – “मारझोड करून इस्लाम स्वीकारण्यास…” राखी सावंतचा पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, “दोन वेळा घटस्फोट…”

“मी अनेक आर्टिस्टची चित्र काढून मी फक्त बघत असतो. हे तुम्हाला कंपोजिशनसाठी मदत करतात. शिवाय तुम्हाला रंग समजण्यास सुद्धा मदत होते. जर दिग्दर्शक व्हायचं असेल, तर खूप महत्त्वाचं आहे चित्र पाहणं, फोटो म्हणतं नाही. चित्र म्हणतोय. कारण चित्रपटामध्ये आर्टिस्ट इंटरप्रिटेशन असतं, जे फोटोत देखील असतं. पण चित्रात ते जास्त उठावदार असतं,” असं म्हणतं चिन्मयनं भावी दिग्दर्शकांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhedar fame chinmay mandlekar advice for the future directors pps