Subhedar Movie : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे कथानक ‘सुभेदार तानाजी मालुसरे’ यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी रविवारी सकाळी मरीन ड्राईव्ह परिसराला भेट दिली.

हेही वाचा : “मुंबईच्या लोकल ट्रेनची भीती…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला अनुभव; म्हणाली, “बायका मला ढकलून…”

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग

दर रविवारी सकाळी ६ ते ७ वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह परिसरात विविध उपक्रम राबवले जातात. या परिसरात मुंबईतील तरुणवर्ग रविवारी एकत्र जमून विविध गाण्यांवर डान्स करत, गाणी गात, वाद्यवादन करत आपली कला सर्वांसमोर सादर करतात. या उपक्रमात ‘सुभेदार’ चित्रपटातील कलाकार सहभागी झाले होते. या चित्रपटातील विविध गाण्यांवर डान्स करून कलाकारांनी प्रेक्षकांचा उत्साह वाढवला.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतचं गाणं ऐकून श्रद्धा कपूर भारावली; मराठीत कमेंट करत म्हणाली, “किती गोड…”

सुभेदार चित्रपटातील “आले मराठे”, “मावळं जागं झालं जी” या गाण्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचा जयघोष करणारी ही गाणी मरीन ड्राईव्ह परिसरात वाजवण्यात आली. या गाण्यांवर तरुणाईसह अजय पूरकर, चिन्मय मांडलेकर, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार थिरकले.

हेही वाचा : पूजा सावंतच्या कुटुंबीयांना बिल्डिंगमधून हाकलून देण्याची मिळालेली ताकीद, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्रीनेच केला खुलासा

चिन्मय मांडलेकरांनी मरीन ड्राईव्ह परिसरातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “जय शिवराय!” अशा कमेंट केल्या आहेत. तर एका युजरने “दादा, आम्हाला तुमचा अभिमान आहे” अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिली आहे. दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader