मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुभेदार’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मृणाल कुलकर्णी त्यांचा लेक विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी शिवानी रांगोळे हे तिघेही एकत्र काम करणार आहेत. कुलकर्णी कुटुंब एकाच चित्रपटात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटात तिघांनाही वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. नुकतीच शिवानी रांगोळेने लाडक्या सासूबाईंचे कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, नेटकरी म्हणाले, “इतका मोठा निर्णय घेण्यासाठी…”

Udayanraje bhosle
“झुकेगा नहीं….”, माधुरी पवार उदयनराजे भोसले यांच्याविषयी बोलताना म्हणाली, “त्यांनी माझ्यासाठी…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
response on loksatta article
लोकमानस : चिंता सर्वांनाच, दखल मात्र नाही!
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Nawab Malik and sameer Wankhede
Sameer Wankhede : नवाब मलिकांना दिलासा; समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी सादर केला क्लोजर रिपोर्ट!
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “शरद पवार अन् खर्गेंचा वाद…”
Shubhangi Gokhle
“मराठी अ‍ॅक्सेंटविषयी, मराठी भाषेविषयी खूप गैरसमज…”, अभिनेत्री शुभांगी गोखले म्हणाल्या, “चुकीचा पंजाबी, बिहारी लोकांचा….”
What Ajit Pawar Said About Saif Ali Khan
Ajit Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्याचा घटनाक्रम सांगत अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “नवा मुद्दा आला की..”

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी संपूर्ण शिवराज अष्टत मालिकेत राजमाता जिजाबाईंची भूमिका साकारली आहे. त्यामुळे सामान्य माणसांमध्ये आणि विशेषत: शिवप्रेमींमध्ये त्यांची ‘आऊसाहेब’ अशी ओळख निर्माण झाली आहे. आता सासूबाई मृणाल कुलकर्णींचे कौतुक करण्यासाठी अभिनेत्री शिवानी रांगोळेने खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती लिहिते, “समस्त शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी ताई आहे याचा अभिमान आणि आनंद, ‘सुभेदार’ चित्रपटात एकत्र काम करून द्विगुणित झाला! या क्षणाबद्दल दिग्पाल लांजेकर यांचे खूप खूप धन्यवाद!!!”

हेही वाचा : Scam 2003 : भरत जाधवसह ‘हे’ मराठमोळे कलाकार गाजवणार हिंदी सीरिज, ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

शिवानी आणि विराजसने ३ मे २०२२ रोजी लग्न केले. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शिवानी आणि मृणाल कुलकर्णी यांच्यामध्ये सासू-सूनेपेक्षा मैत्रीचे नाते आहे. म्हणूनच शिवानी सासूबाईंना ताई या नावाने हाक मारते. या पोस्टमध्येही शिवानीने मृणाल कुलकर्णी यांचा उल्लेख ताई असा केला आहे.

हेही वाचा : “माझ्या सासूचं लग्न!”, मिताली मयेकरने सासूबाईंना दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा; म्हणाली, “एवढा मोठा निर्णय…”

दरम्यान, ‘सुभेदार’ हा श्री शिवराज अष्टक मालिकेतील पाचवा चित्रपट येत्या दोन दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची कथा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात मृणाल कुलकर्णी यांनी ‘राजामाता जिजाऊ’ यांची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री शिवानी रांगोळेने सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. विराजस कुलकर्णी बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर समूहात ‘जीवा’ ही भूमिका साकारताना आपल्याला दिसेल.

Story img Loader