मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. श्री शिवराज अष्टक मालिकेतील हा पाचवा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. सुभेदारांची प्रशासकीय रणनिती, कोंढाण्याची लढाई या सगळ्या गोष्टींचा इतिहास प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : “महाविद्यालयात कधीच गेले नाही, फक्त…”, दीपिका पदुकोणचं शिक्षण किती माहितेय का?, स्वत:च केला होता खुलासा

अलीकडेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सिंहगडावर जाऊन नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरने सुभेदारांची प्रतिमा असलेला खास टी-शर्ट परिधान केला होता. या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा टी-शर्ट सुभेदार चित्रपटातील कलाकारांसाठी खास डिझाईन करण्यात आला आहे. सुरज भोई या ‘सुभेदार’ टीममधील तरुणाने हा टी-शर्ट बनवला आहे.

हेही वाचा : “इतकी लाज नको सोडू…”, सुव्रत जोशीने सांगितला ‘दिल दोस्ती’च्या ऑडिशनचा किस्सा; म्हणाला, “रात्री मित्रांबरोबर पार्टी करुन…”

सिंहगडावर टी-शर्ट परिधान केल्यावर चिन्मय मांडलेकरने या सुरज भोईसाठी खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये अभिनेत्याने “किल्ले सिंहगड हे आपलं तीर्थक्षेत्रच! सुरज भोई या आमच्या मित्राचे खूप आभार. मी परिधान केलेला टी-शर्ट त्यानेच भेट दिला आहे.” असे म्हटले होते.

हेही वाचा : “…म्हणून आज टिव्ही माध्यमाचा आदर करतो”, स्वानंदी टिकेकरने सांगितला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेचा अनुभव

ट्रेलर लॉन्च सोहळ्यानंतर सुरजने हे टी-शर्ट सर्व कलाकारांना भेट दिले. यानंतर त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत हे टी-शर्ट बनवण्यामागचा त्याचा उद्देश सांगितला. “आजकाल लोक सर्वत्र हल्क, सुपरमॅन, कॅप्टन अमेरिका यांसारख्या फेक सुपरहिरोंची चित्रं अभिमानाने आपल्या छातीवर मिरवतात. आपल्या मातीतले… ज्यांनी स्वराज्यासाठी, राजांसाठी हसत हसत बलिदान दिले त्या खऱ्या सुभेदारांची प्रतिमा आपण मराठी माणसानेच अभिमानाने छातीवर मिरवली पाहिजे. ही इच्छा उरात बाळगून सुभेदार चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात चिन्मय दादांना आम्ही रेखाटलेले तानाजी मालुसरे यांचे डिजिटल पेंटिंग असलेले टिशर्ट भेट म्हणून दिले. चिन्मय दादांनी तो टी-शर्ट थेट जिथे हा तानाजीरावांचा रणसंग्राम घडला, त्या सिंहगडावर, सुभेदारांच्या समाधीसमोर नतमस्तक होताना परिधान करावा… खरंच माझ्या कडे शब्द नाहीत! डोळ्यातून केवळ आनंदाश्रू तरळत आहेत याच्या समोर सर्व काही फिके आहे, चिन्मय दादा मनापासून धन्यवाद!” असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुभेदारांच्या प्रतिमेचे टी-शर्ट पाहून नेटकऱ्यांनी चिन्मय मांडलेकर आणि या तरुणाचे कौतुक केले आहे. दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhedar movie chinmay mandlekar wore special t shirt with artwork of subedar tanaji malusare sva 00
Show comments