मराठी मनोरंजनविश्वात सध्या ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘सुभेदार’ चित्रपट हा श्री शिवराज अष्टक मालिकेचा पाचवा भाग असून याचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. शिवराज अष्टक मालिकेच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आज चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी पहिल्या शोपासून सिनेमागृहांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video: ‘सुभेदार’बद्दल प्रेक्षकांच्या ‘त्या’ कृतीमुळे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नाराज; म्हणाले, “तुम्ही सगळे…”

‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित झाल्यावर पुण्यात थिएटर बाहेर या चित्रपटाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दुग्धाभिषेक घालण्यात आल्याचा व्हिडीओ चिन्मय मांडलेकरने इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पुण्यातील कोथरुड परिसरातील आहे. या व्हिडीओमध्ये दोन ते तीन चाहते चित्रपटगृहाबाहेरील पोस्टरवर दुग्धाभिषेक करत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : हेमा मालिनींनी सांगितलं करण देओलच्या लग्नाला न जाण्याचं कारण; दोन्ही कुटुंबातील मतभेदांबद्दल म्हणाल्या, “सनी व बॉबी…”

दुग्धाभिषेकाचा व्हिडीओ शेअर करत याला “केवळ आणि केवळ कृतज्ञता” असे कॅप्शन चिन्मय मांडलेकरने दिले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी चित्रपटाचे विशेषत: क्लायमॅक्स सीनचे भरभरून कौतुक करत आहेत. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे. युट्यूबवर सर्वात कमी वेळेत ‘सुभेदार’च्या ट्रेलरने २ मिलियनहून अधिक व्ह्यूजचा टप्पा ओलांडला होता.

हेही वाचा : “प्रत्येक चेहऱ्यामागचे रहस्य…”, ‘जवान’मधील शाहरुख खानचे ५ लूक्स पाहिलेत का?, मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांची मैत्री, कोंढाण्याची लढाई यावर आधारित सुभेदार चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.