छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षात प्रदर्शित झाले आहेत. लवकरच बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारलेला आहे. यापूर्वी ‘सुभेदार’चा टीझर ३० जूनला प्रदर्शित करण्यात आला होता. आता उद्या या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने अभिनेता चिन्मय मांडलेकरने खास घोषणा केली आहे.

हेही वाचा : “गाडी थांबवून १५ मिनिटं रडलो”, ‘दुनियादारी’ चित्रपटाबद्दल दिग्दर्शकाने सांगितली जुनी आठवण; म्हणाले, “पुण्याला जाताना…”

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”

बहुचर्चित सुभेदार चित्रपटातील “मावळं जागं झालं रं” हे गाणे उद्या प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र, या गाण्यासह प्रेक्षकांना एका आनंदाची बातमी मिळणार आहे. याबाबत अभिनेता चिन्मय मांडलेकरने खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने, “उद्या प्रदर्शित होणाऱ्या “मावळं जागं झालं रं” गाण्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे एक आनंदाची बातमी” असे लिहिले आहे. सध्या अभिनेत्याच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : “मागे गटारी सेलिब्रेशन…”, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरच्या अमेरिकेतील फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

चिन्मय मांडलेकरने शेअर केलेल्या पोस्टवर सध्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी “ट्रेलर केव्हा येणार हे तुम्ही उद्या सांगणार आहात का?” असा प्रश्न अभिनेत्याला विचारला आहे. तसेच इतर काही जणांनी कमेंटमध्ये, ही आनंदाची बातमी काय असेल याबाबत आमच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : सलमान बिग बॉसमधून बाहेर, आता कुठल्याही पर्वात करणार नाही सूत्रसंचालन?

दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपट हा शिवराज अष्टक मालिकेतील पाचवे चित्रपुष्प सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. हा चित्रपट २५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर, अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची, तर मृणाल कुलकर्णी माता जिजाऊंची भूमिका साकारणार आहे.

Story img Loader