मराठी कलाविश्वात सध्या ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मृणाल कुलकर्णी त्यांचा लेक विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी शिवानी रांगोळे हे तिघेही एकत्र काम करणार आहेत. कुलकर्णी कुटुंब एकत्र चित्रपटात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या तिघांनी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. मुलगा आणि सून ‘सुभेदार’मध्ये काम करत असल्याचे मृणाल कुलकर्णींना समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती? याबाबत त्यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “एक पाऊल ‘त्या’ प्रत्येक मुलींसाठी…”, स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेने शेअर केलेली शॉर्ट फिल्म चर्चेत

मृणाल कुलकर्णी ‘सुभेदार’ चित्रपटातील भूमिकांबद्दल सांगताना म्हणाल्या, “विराजस आणि शिवानी दोघेही चित्रपट काम करणार हे समजल्यावर मला प्रचंड आनंद झाला कारण, दिग्पालने माझ्या नकळत त्यांच्याशी संपर्क साधला होता. आपण तिघेही एकत्र सिनेमात असणार म्हणजे खूपच मजा…अशी भावना माझ्या मनात होती.” यावर दिग्पाल लांजेकरांनी “मी परस्पर या सगळ्यांना भेटून भूमिकांबद्दल कळवले होते”असे सांगितले.

हेही वाचा : “विशिष्ट समुहामुळे माझे करिअर…”, ‘जय हो’ फेम डेझी शाहचा बॉलीवूडबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, “मानसिक तणावामुळे…”

मृणाल कुलकर्णी पुढे म्हणाल्या, “दोघेही कोणती भूमिका करणार याबाबत माझ्या मनात प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे मी दोघांनाही त्यांच्या भूमिकांची नावं काय? असा प्रश्न विचारला. शिवानीला जेव्हा मी भूमिकेबद्दल विचारले तेव्हा ती मला म्हणाली, ‘मी मालुसरे आहे.’ मग, मी सुद्धा तिला म्हणाले, हो का…मी भोसले आहे. यानंतर आम्ही दोघींनी मिळून विराजस तू कोणती भूमिका साकारणार असा प्रश्न विचारला. तेव्हा विराजस म्हणाला, ‘मला नाही माहिती मी कोण आहे…गुप्तहेराची भूमिका साकारत असल्याने मी कोणीही असू शकतो.”

हेही वाचा : “दिग्पालला एका क्षणात…”, स्मिता शेवाळेने सांगितला ‘सुभेदार’बद्दलचा अनुभव; म्हणाली, “माझं खूप मोठं भाग्य…”

दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपटात मृणाल कुलकर्णी यांनी राजामाता जिजाऊ यांची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री शिवानी रांगोळेने सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. विराजस कुलकर्णी बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर समूहात भूमिका साकारताना आपल्याला दिसेल. हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhedar movie mrinal kulkarni shared incident when she knew about son virajas and daughter in law shivani role in subhedar sva 00
Show comments