दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा ऐतिहासिक चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. ‘सुभेदार’मध्ये तानाजी मालुसरे यांची भूमिका अजय पूरकर यांनी साकारली असून त्यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे साकारणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा पुणे येथे संपन्न झाला. या वेळी चित्रपटातील काही मुख्य कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. स्मितानेही ‘सुभेदार’ चित्रपटाबद्दलचे अनेक अनुभव आणि किस्से प्रेक्षकांना सांगितले.
हेही वाचा : “…म्हणून माझे दोन वाढदिवस आहेत”, पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा; म्हणाले, “माझ्या भावाने…”
मीडियाशी संवाद साधताना स्मिताला सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेबद्दल पहिल्यांदा विचारणा झाली तेव्हा मनात काय भावना होती? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “एवढ्या मोठ्या ऐतिहासिक चित्रपटात काम करायला मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. दिग्पाल लांजेकरसारखा मोठा दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला एखाद्या भूमिकेसाठी विचारतो तेव्हा लोक जराही वेळ न घेता त्याला थेट होकार कळवतात. एका क्षणात मी दिग्पालला भूमिकेसाठी होकार कळवला होता.”
हेही वाचा : कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने शेअर केले जुने फोटो, तुम्ही ओळखलंत का?
स्मिता शेवाळे पुढे म्हणाली, “मी अशा एका संधीची खरंच वाट बघत होते आणि त्याने समोरुन मला या भूमिकेसाठी विचारले हे माझे खूप मोठे भाग्य आहे. माझ्या मुलाला सर्वप्रथम या गोष्टीबद्दल सांगितले. ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेमुळे कबीर आधीपासून दिग्पालला ओळखत होता. त्यामुळे मी आणि माझ्या मुलाने हा चित्रपट मिळाल्याचा आनंद एकत्र साजरा केला होता.”
हेही वाचा : ‘ही’ आहे सर्वात श्रीमंत अभिनेत्री, शाहरुख-सलमानपेक्षाही कमावते जास्त पैसा, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क
दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपट काही तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा एकदा २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.