मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता लवकरच शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे कथानक ‘सुभेदार तानाजी मालुसरे’ यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. प्रदर्शित झाल्यावर अवघ्या दोन दिवसांत या ट्रेलरने नवा विक्रम रचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “२०० टेक, पॅनिक अटॅक अन्…”, ‘रॉकी और रानी’ फेम अभिनेत्रीने सांगितली ऑडिशनची आठवण; म्हणाली, “खूप रडले…”

‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर ७ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शित झाल्यावर अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाच्या ट्रेलरने नवा विक्रम रचला आहे. ट्रेलरला अवघ्या दोन दिवसांत २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मराठी भाषेत अशी कामगिरी करणारा आणि ट्रेलरला वेगाने २ मिलियन व्ह्यू मिळवणारा ‘सुभेदार’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. यासंदर्भात अभिनेता चिन्मय मांडलेकरने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

हेही वाचा : ९३ वर्षीय दिग्दर्शक आणि ‘ही’ ज्येष्ठ अभिनेत्री ‘सुभेदार’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका, चिन्मय मांडलेकरने केला खुलासा…

अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाला, “आपल्या सुभेदारच्या ट्रेलरला अवघ्या २ दिवसांत २ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूजचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार..! आता भेटूया १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात…”

हेही वाचा : “…तर तो स्वातंत्र्यवीरांचा अपमान असेल”, मनसेचा थेट रणदीप हुड्डाला इशारा; म्हणाले, “सावरकरांवर हक्क गाजवण्याचा…”

चिन्मय मांडलेकरने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. एका युजरने “मराठीतले सगळे रेकॉर्ड मोडणार आता… जय शिवराय” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, आणखी एका युजरने, “जय भवानी ट्रेलर खूप सुंदर झाला आहे.” अशी कमेंट या पोस्टवर केली आहे. दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhedar movie trailer breaks a new record actor chinmay mandlekar shared a special post sva 00