दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘श्री शिवराज अष्टका’मधील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट असून यामध्ये तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, अशातच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलण्यात आली आहे. याची माहिती अभिनेता चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावरद्वारे दिली आहे.

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: अभिषेक मल्हान की एल्विश यादव कोण आहे जास्त श्रीमंत? जाणून घ्या दोघांची नेटवर्थ

devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
marathi movie Phulvanti will be released on October 11
‘फुलवंती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”

‘सुभेदार’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची मूळ तारीख २५ ऑगस्ट होती. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १८ ऑगस्ट करण्यात आली होती. पण आता पुन्हा तांत्रिक अडचणीमुळे चित्रपट २५ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार आहे. यासंबंधित चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये लिहिलं आहे की, “जय जिजाऊ! जय शिवराय! नमस्कार.. छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर तान्हाजीराव मालुसरे यांचा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर आपणां सर्वांना अनुभवता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आम्ही सगळे सुद्धा तुमच्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही चित्रपट तुमच्या भेटीला आणणारच आहोत. यासाठी लागणार काळ आणि तुमची साथ आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. या तांत्रिक अडचणीवर मात करून श्री शिवराज अष्टकातले पाचवे पुष्प ‘सुभेदार’ दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित करीत आहोत. या अडचणीच्या काळात तुम्ही सर्व रसिक मायबाप आणि शिवभक्त आमच्या पाठीशी आधार बनून उभे रहाल ही खात्री आहे. हर हर महादेव.”

हेही वाचा – “…तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं”, चिन्मय मांडलेकरने सांगितला किस्सा; म्हणाला, “महाराजांची भूमिका साकारणे…”

हा फोटो शेअर करत चिन्मय यानं लिहिलं आहे की, “जिकत नाही जवर तवर झुंजत राह्याचं…! आम्हीही शिवरायांचे मावळे आहोत, अडचणींवर मात करणार आणि २५ ऑगस्टला तुमच्या भेटीस नक्की येणार…!”

हेही वाचा – “डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत…”, अभिनेत्रीने खंत व्यक्त करत सांगितला अनुभव, म्हणाली…

दरम्यान, ‘सुभेदार’ या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका अजय पुरकरने साकारली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पुन्हा चिन्मय पाहायला मिळणार आहे.