मराठी अभिनेता सुबोध भावे ‘हर हर महादेव’ चित्रपटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. १८ डिसेंबरला हा चित्रपट झी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर काही शिव भक्तांनी सुबोध भावेची कोल्हापुरात भेट घेतली होती. या चित्रपटातील काही उल्लेख आणि दृश्यांवरुन वाद असून ते काढून टाकावेत अशी मागणी शिवभक्तांनी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुबोध भावेने या शिवभक्तांबरोबर संवाद साधताना यापुढे कोणताही ऐतिहासिक बायोपिक करणार नसल्याची घोषणा केली होती. “माझं महाराजांवरील प्रेम आयुष्यभर राहील. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं आहे. ते मी मरेपर्यंत करत राहणार. पण इथून पुढे ऐतिहासिक चित्रपटातील कोणाचीही भूमिका बापजन्मात करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक सिनेमा असेल,” असं सुबोध भावेने म्हटलं होतं.

हेही वाचा>> “लग्नातील शालू…” ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

सुबोध भावेने यावेळी संत तुकाराम महाराजांवर चित्रपट करत असल्याचंही सांगितलं. तो म्हणाला, “मी आता संत तुकाराम महाराजांवर चित्रपट करत आहे. तुकाराम महाराज माझ्याकडे २२ वेळा आले. माझा पहिला चित्रपट हा तुकाराम महाराजांवर होता. परंतु, काही कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही”.

हेही वाचा>>उर्फी जावेदला झाला आहे ‘हा’ गंभीर आजार; दुबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल

दरम्यान, सुबोध भावे हिंदी सिनेमात संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ओम वैद्य करत आहेत. मे २०२२मध्येच संत तुकाराम महाराजांवरील या बायोपिकची घोषणा करण्यात आली होती.