झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या हर हर महादेव या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील बहुतांश कलाकारांचे लूक समोर आले आहेत. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. हा ट्रेलर पाहता एकंदर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट तगडी टक्कर देणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या आणि छत्रपती शिवरायांच्या एंट्रीने होते. यानंतर बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात असलेले मतभेद पाहायला मिळत आहे. ‘ज्याला रयतेचा आशीर्वाद तो मराठी’, ‘ज्याला जाती पाती वर्ज्य तो मराठी’, ‘भगवा ज्याचा श्वास तो मराठी’ असे डायलॉग यात पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा : राज ठाकरेंचा दमदार आवाज असलेल्या ‘हर हर महादेव’मध्ये झळकणार ‘हे’ कलाकार, नावं समोर

यानंतर बाजीप्रभू देशपांडे कशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वराज्याच्या कार्यात सहभागी होतात. ‘राजासाठी सैनिक मरतातंच, पण एका क्षुल्लक सैनिकासाठी मरायला तयार झालेला राजा मी पहिल्यांदाच पाहिला’, असा अंगावर काटा आणणारा डायलॉगही बाजीप्रभूंच्या तोंडी पाहायला मिळत आहे. यानंतर घोडखिंडीत झालली लढाई, बाजीप्रभू देशपांडेंची चातुर्यबुद्धी यात पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “मुलुख माझा, हुकूम माझा मग भाषा पण माझीच…” राज ठाकरेंचा दमदार आवाज असलेल्या चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

दरम्यान येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तर ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ यांनी केली आहे. यात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, हार्दिक जोशी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh bhave har har mahadev movie official trailer release on 25th october nrp
Show comments