चित्रपट असो वा मालिका आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिनयाचं कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता म्हणजेच सुबोध भावे. सुबोधने त्याच्या पत्नी मंजिरीसाठी एक खास व्हिडी शेअर केला आहे. याबरोबरच तो एक नवीन गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचंही सुबोध म्हणाला आहे. याबाबत सुबोधने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये सुबोध भावे म्हणाला, “नमस्कार, आज आमच्या सेटवरून एक खास गोष्ट तुमच्याशी शेअर करायचीय. नवीन, नाजूक, हळूवार रोमॅंटीक गोष्ट लवकरच घेऊन येतोय मी तुमच्या सगळ्यांसाठी. आजच्या दिवशी ही गोष्ट शेअर करावीशी वाटली कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज ६ मे आणि बरोबर ३३ वर्षांपूर्वी १९९१ साली मी मंजिरीला प्रपोज केलं होतं आणि तिने मला हो म्हटलं होतं.”

हेही वाचा… करण जोहरची नक्कल करणाऱ्या केतन सिंगने मागितली माफी; म्हणाला, “माझ्या वागण्याने त्यांना त्रास…”

“मंजिरी आठवतंय ना आणि कुठे हो म्हटलं होतस हे आठवतय का? पुण्याच्या बालगंधर्वच्या पुलावर. आमची ही लव्हस्टोरी सुरू झाली मग त्याच्यानंतर तिच काही वर्ष इथे असणं. मग अचानक कॅनेडाला निघून जाण. मग ती पत्र, चोरून पाठवलेली पत्र, मित्रांच्या नावाने पाठवलेली पत्र, त्यांची वाट बघण्यात गेलेले अनेक दिवस, मग हळूहळू इमेल्स आणि मग ४ ५ वर्षाच्या विराहानंतर मंजिरी परत आली. आठवतंय का?”

“पण खर सांगतो तुझ्याबरोबर त्यानंतर आयुष्यातल्या सगळ्या सुख दुखांच्या गोष्टी शेअर केले पण तुझ्याबरोबरची प्रत्येक आठवण ही मात्र गोडच आहे आणि मंजिरी तू मला विश्वास दिलास की जगायला श्वासाची नाही प्रेमोची गरज असते.”

हेही वाचा… ‘हीरामंडी’च्या शूटिंगदरम्यान संजय लीला भन्साळींनी अदिती राव हैदरीला जेवण्यास केली होती मनाई; अभिनेत्री म्हणाली, “तेव्हा मी जेवले नाही”

या व्हिडीओला कॅप्शन देत सुबोधने लिहिलं, मंजिरी, ३३ वर्षांपूर्वी आपलं प्रेमाचं नातं खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि ‘जगण्यासाठी श्वासाची नाही प्रेमाची गरज असते’, हे मला कळलं. आपली ही एक गोड आठवण आज मी तुझ्यासोबत नव्याने शेअर करतोय, पण जराशा हटके पद्धतीत. हा खास व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी…”

हेही वाचा… VIDEO: “श्रद्धा वहिनी झाडू घेऊन…”, ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीची भन्नाट रील व्हायरल, चाहते म्हणाले…

दरम्यान, सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटानंतर सुबोध या चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय. सुप्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहेत.