मराठी अभिनेता सुबोध भावे व त्याची पत्नी मंजिरी यांची लव्ह स्टोरी फारच खास आहे. दोघेही शाळेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सुबोध १०वी ला होता, तर मंजिरी आठवीत होती. दोघांच्या पहिल्या भेटीला आता जवळपास ३२ वर्षांचा काळ लोटला आहे, तर त्यांच्या लग्नाला २२ वर्षे झाली आहेत.
सुबोधने नुकतीच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली, यामध्ये अवधूत गुप्तेने सुबोधला त्याच्या व मंजिरीच्या लव्ह स्टोरीवर बायोपिक बनवण्यात आली तर त्याचं नाव काय असेल व त्यात कोणते कलाकार तुमच्या भूमिका साकारतील असं विचारलं. त्याचं सुबोधने उत्तर दिलं. ‘एकमेकांचं यश साजरं करणारी तुमची जोडी सर्वांना खूप आवडते. जर तुमची लव्ह स्टोरी एक बायोपिक असेल तर त्याचं नाव काय असेल आणि त्यात तुझा आणि मंजिरीचा अभिनय करण्यासाठी तुम्ही दोघे सोडून कोणती जोडी अनुरुप ठरेल?’ असा प्रश्न अवधूतने सुबोध भावेला विचारला.
“मी सिगारेट ओढत होतो अन्…”, सुबोध भावेने मंजिरीला रक्ताने लिहिलेलं पत्र; खुलासा करत म्हणाला…
सुबोध म्हणाला, “‘शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट’ असं बायोपिकचं नाव असेल. मी तिला जेव्हा प्रपोज केलं तेव्हा ‘शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट इफ आय लव्ह यू, व्हॉट इज माय फॉल्ट’ असं म्हटलं होतं. त्यातलं टशुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट’ इतकंच मी बायोपिकचं नाव घेतलं आहे. ‘एक जगावेगळी प्रेमकहाणी’ असं खाली मराठीत लिहायचं.”
त्याची व मंजिरीची भूमिका साकारण्यासाठी सुबोधने कलाकारही निवडले. “मृण्मयी देशपांडेला मी मंजिरीच्या भूमिकेसाठी घेईन आणि माझ्या रोलसाठी मी ललित प्रभाकरला निवडेन,” असं सुबोधने सांगितलं.